Ticker

6/recent/ticker-posts

कुर्ला नेहरू नगर येथे बौद्ध समाज संवाद दौऱ्याची बैठक !


चित्रा न्युज प्रतिनिधी
कुर्ला-  धम्मकुटी बुध्द विहार नेहरु  नगर, कुर्ला पूर्व येथे बौद्ध समाज संवाद दौरा संपन्न झाला. बौद्ध बांधवांनी राजकीय, सामाजिक आणि धार्मिक समस्या, अडचणी यावर प्रश्न विचारले त्यावर वंचित बहुजन आघाडी युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे यांनी सर्व प्रश्नांचे निरासन केले.

मुंबई विभागात होत असलेल्या या बौद्ध समाज संवाद दौऱ्याला बौद्ध बांधवांचा कुर्ला येथे मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच बौद्ध समाजाच्या अनेक प्रश्नांचे निरासन या दौऱ्यामुळे झाले.

कुर्ला विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते/ भारतीय बौद्ध महासभा/बौध्दजन पंचायत समिती/ स्थानिक मंडळ/ जयंती उत्सव कमिटी आणि बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता 
--

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या