Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम व राज्यस्तरीय मेळावा आणि उद्घाटन सोहळा संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-1 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथक उपजिल्हा रुग्णालय मोर्शी अंतर्गत ए. आर. पाटील पब्लिक स्कूल येथे राज्यस्तरीय मेळावा व उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ही मोहीम मा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिलीप सौंदळे सर, मा डॉ संदीप हेडाऊ सर बाह्य रुग्ण संपर्क अधिकारी,  मा वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार सर यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन शुभांगी चव्हाण मॅडम(BRC) पंचायत समिती मोर्शी यांचे तर्फे करण्यात आले.
        या मोहिमेचा उद्देश "निरोगी बालपण सुरक्षित भविष्य" हा असून यामध्ये 0 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषधोपचार दिला जातो. तसेच गरजू विद्यार्थ्यांना संदर्भ सेवा देण्यात येते. यावेळी 329 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 67 विद्यार्थ्यांना किरकोळ आजारावर औषध उपचार देण्यात आला व 32 मुले संदर्भ सेवेकरता निवडण्यात आली. 
               ही मोहीम उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील RBSK पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ दिलीप टिंगने, डॉ गिरीश धोटे,डॉ मेघा झामडे, डॉ संगीता जैन, रितेश कुकडे, स्नेहलता खोडसकर, विनय शेलुरे, प्रशांत बेहरे, अंकिता पंडागळे यांचे मार्फत राबविण्यात आली यावेळी शाळेच्या संचालिका पूनम मोहोड प्राचार्य उज्वला चौधरी, विजया अंधारे व शाळेतील इतर सर्व शिक्षक वृंद हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या