Ticker

6/recent/ticker-posts

नावालाच आहे प्लॅस्टिक बंदी ; हाळीहंडरगुळीच्या विक्रेत्यांची चांदी.


 चित्रपट न्युज प्रतिनिधी
लातूर :-प्लॅस्टिक कॅरिबॅग,ग्लास व चहा कप यांच्या वापरावर व विक्रीवर बंदी असल्याच्या बातम्या विविध दैनिक व चॅनल मधून वाचण्यात,पाहण्यात येतात.माञ,ही बंदी नावालाच आहे! याचा प्रत्यय उदगीर तालुक्यातील हाळी-हंडरगुळीकरांना येतोय.कारण या गावात व रविवारच्या आठवडी बाजारात बंदी असलेल्या कॅरीबॅग, कागदी व प्लॅस्टिक कप,ग्लास यांचा वापर सर्रासपणे छोटे-मोठे व्यापारी करीत असल्याचे दिसतात.तसेच या 2 गावातील कांही किराणा व भुसार तसेच स्टेशनरी विक्रेते होलसेल मध्ये कमी जाडीच्या व बंदी असलेल्या कॅरिबॅग व प्लॅस्टिक कप यांचे बंडल्स बेभावात विकताना दिसतात,यामुळे नावातच आहे प्लॅस्टिक बंदी!बंदीच्या नावाखाली हाळीहंडरगुळीच्या कांही व्यापा-यांची होतेय आर्थीक चांदी.!! असे म्हणणे चूक ठरणार नाही.तेंव्हा कॅन्सरसारख्या आजारांना आमंञण देणा-या कॅरिबॅग्ज व प्लॅस्टिक विक्री करणा-या व्यापा-यांवर कारवाही कोण व कधी करणार?असा प्रश्न जाणकार जनतेतून प्रशासनाला विचारला जात आहे.
कमी जाडीच्या कॅरिबॅग व प्लॅस्टिक कप,ग्लास हे मानवांसह गुराढोरांच्या शरीरासाठी हाणीकारक आहे.आणि अशा कप,ग्लासच्या वापरापासून मानवाच्या आरोग्याला कॅन्सरसारखे आजार होण्याचा दावा संशोधकांनी केला असल्याने प्रशासनाने सिंगल यूज प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी व कडक निर्बंध लागू केले आहे.शासन नियमानुसार १२० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावरही बंदी आहे.
केंद्रीय व राज्य वने,पर्यावरण खात्या तर्फे अधिसुचीत केलेल्या सुधारित प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन नियमा प्रमाणे सिंगल यूज,कमी माॅयक्राॅनची पिशवी,कप,ग्लास आदी वस्तूंना बंदी आहे.तरीही हाळीहंडरगुळी येथील बहूतांश हाॅटेल्स,किराणा,स्टेशनरी, फळं विक्रेते प्लॅस्टिक पिशव्या,कपं यांचा सर्रासपणे वापर करतात.तसेच हाळी-हंडरगुळीतील कांही किराणा व जनरल स्टोर्सवाले होलसेल मध्ये कॅन्सरसारखा आजारांना आमंञण देणा-या प्लॅस्टिक कॅरिबॅग,कप,ग्लस यांची सर्रासपणे विक्री करतात.आण् बंदी असलेल्या व सिंगल यूजसाठी असलेल्या कॅरिबॅग,कप,ग्लास यांची रोज होलसेल विक्रेत्या व्यापा-यांची एकञित उलाढाल पंधरा,विस हजार रुपयांची होत असल्याची शंका आहे तेंव्हा नावालाच बंदी असलेल्या कप व अन्य सिंगल यूज प्लॅस्टिक विक्री करुन स्वत:ची आर्थीक चांदी करुन घेणा-या हाळी-हंडरगुळी येथील त्या होलसेल विक्रेते असलेल्या जनरल स्टोर्स व किराणा दुकाणदारांवर कारवाही करावी,आणि कॅन्सर सह इतर रोगांपासून मानवांसह गुरांचेही प्राण संबंधित प्रशासनाने वाचवावे. अशी मागणी होत आहे.

उदगीरहून एकजण देतोय माल

मानवांसह गुरांच्याही आरोग्यासाठी धोकादायक असलेले प्लॅस्टिक कप, ग्लास,कॅरिबॅग यांची होलसेल विक्री करणारे कांही किराणा व जनरल स्टोर्सवाले असलेतरीही गावातीलच एक इसम उदगीरात राहतो,आणि हाॅटेल,ढाबे,फळगाडे आदींना बंदी असलेले कप,कॅरिबॅग यांचे बंडल्स उदगीरहून आणुन येथे विकत असतो याच्यावर व स्थानिक होलसेल कप, कॅरिबॅग विक्रेत्यांवर त्वरीत कारवाही होणे गरजेचे आहे.अन्यथा मनुष्यांना व गुरांना जीवघेणा रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या