Ticker

6/recent/ticker-posts

करंजी येथील महिला शेतकऱ्याचा शॉर्टसर्किटमुळे दिड तुषार संच जाळून जाग्यावरच खाक ....


लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड                           

 नांदेड :-हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथील अल्पभूधारक महिला  शेतकरी प्रमिला प्रभाकर चव्हाण सर्वे नंबर 109 मधील ऊस गेल्यानंतर पाचट कुट्टी केलेल्या ऊसाला पाणी देण्यासाठी ठेवलेल्या   दिड तुषार चे संच शॉर्टसर्किट झाल्यामुळे जाळून जागेवरच खाक झाले आहे. ही घटना दिनांक 30 मार्च रोजी दुपारी तीन च्या सुमारास घडली असल्याचे तेथील शेतकरी रंगराव जाधव  यांनी सांगितले आहे अगोदरच कारखान्यांनी ऊस नेण्यास विलंब केला असल्यामुळे शेतकऱ्यांना बराच नुकसानीचा सामना करावा लागत आहे तसेच हिमायतनार शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक विजेच्या तारा ह्या जीर्ण झाले असून या गोष्टीकडे  महावितरणचे संबंधित अधिकारी कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागून शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या दुर्घटनेत करंजी येथील  महिला शेतकरी प्रमिला प्रभाकर चव्हाण यांच्या शेतातील दिड तुषार संच  आगीच्या चपाट्यात येऊन जागीच खाक झाले आहेत या अल्पभूधारक शेतकऱ्याचे अंदाजे 60 ते 70 हजार नुकसान झालेले आहे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी महावितरण विभागांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सूर्या ग्रुपचे जिल्हाध्यक्ष राज गाडेकर यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या