Ticker

6/recent/ticker-posts

रस्ते व पुलांच्या कामाचे बोर्ड लावा- बिरसा फायटर्स

कार्यकारी अभियंता ,सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना निवेदन

चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा : रस्ता व पुलाच्या कामांचे बोर्ड कामाच्या ठिकाणी  लावा,अशी मागणी  बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,वनसिंग पटले,जयराम पटले,नारसिंग वसावे,दिनेश वळवी,मोदा पावरा इत्यादी कार्यकर्ते  उपस्थित होते.
                              सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा जि.नंदुरबार अंतर्गत रस्ते व पुलांच्या कामांची कामे केली गेली आहेत व काही कामे सुरू आहेत.सदर कामांचे बोर्ड संबंधित ठेकेदार लावत नाहीत. त्यामुळे रस्ता व पूल कोणत्या योजनेंतर्गत केला जात आहे,ठेकेदाराचे नाव काय,रस्ता व पुलाची अंदाजित रक्कम किती? इत्यादी माहिती लोकांना माहीत पडत नाही.रस्ता व पुलाचे निष्कृष्ट काम सुरू असतांना किंवा केल्यानंतर कोणत्या रस्ता व पूलाबद्धल व कोणत्या ठेकेदाराविरुद्ध तक्रार करावी,हे तक्रारदारास कळत नाही.योजनेचे नाव, कामाचे नाव, ठेकेदाराचे नाव, कामाची एकूण मंजूर रक्कम इत्यादी माहिती  असलेले रस्ता व पुलाचे कामांचे बोर्ड कामाच्या ठिकाणी लावण्यात यावेत,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या