Ticker

6/recent/ticker-posts

बल्लापुर येथील तहसीलदार व तलाठी ACB च्या जाळ्यात


चित्रा न्युज  प्रतीनीधी
चंद्रपुर : बल्लारपुर तहसीलचे तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड, व तलाठी सचिन रघुनाथ पुकळे  कवडजई साजा, ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर (वर्ग ३) यांचेविरूध्द दोन लाख विस हजार रुपयांची लाचेची मागणी केल्या प्रकरणी ला.प्र.वी.  अधिकारी चंद्रपूर यांची मोठी कारवाई

याबाबत प्राप्त माहितीनुसार तक्रारदार हे मौजा कोठारी, ता. बल्लारशाह, जि. चंद्रपूर येथील रहीवासी असुन बिल्डींग मटेरिअल सप्लायरचा व्यवसाय असुन . तक्रारदार यांची मौजा कवडजई, ता. बल्लारशाह येथे शेती असुन दि. २३/०३/२०२५ रोजी २ ट्रक्टर व १ जे.सी.बी. च्या सहाय्याने त्यांचे शेतातील माती/मुरूम काढून शेताचे लेवलींगचे काम करीत असतांना कवडजई येथील तलाठी सचिन पुकळे व बल्लारशाह तहसीलचे तहसीलदार श्री. अभय गायकवाड यांनी तक्रारदार यांना माती/मुरूम काढण्याची परवानगी नसल्याने शेतात असलेले २ ट्रक्टर व १ जे.सी.बी. जप्त न करण्याकरीता तसेच तक्रारदार यांचेवर कोणतीही कारवाई न करण्याकरीता तहसीलदार यांचे करीता २ लाख रू. आणी तलाठी करीता २० हजार रू. असे एकुण २ लाख रू. २० हजार रू. लाचेची मागणी केली. तसेव त्याचदिवशी तलाठी सचिन पुकळे व तहसीलदार श्री. गायकवाड यांनी तक्रारदार यांचेकडून १ लाख १९ हजार रू. स्विकारले. उर्वरित १ लाख रू. देण्याकरीता तहसीलदार व तलाठी यांनी तक्रारदार यांचेकडे तगादा लावण्याने तक्रारदार यांनी त्यांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून दि. २६/०३/२०२५ रोजी ला.प्र.वि. कार्यालय चंद्रपूर येथे रितसर तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीवरून दि. २६/०३/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड तहसील कार्यालय बल्लारपूर (वर्ग १) यांनी दिलेल्या प्रोत्साहना वरून तलाठी सचिन रघुनाथ पुकळे, कवडजई साजा, ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर (वर्ग ३) यांनी तक्रारदार यांना तडजोडी अंती ९० हजार रू. मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शवीली. त्यावरून आज दि. ०१/०४/२०२५ रोजी सापळा कारवाई करीता तक्रारदार यांना अभय गायकवाड यांचेकडे पाठविण्यात आले असता त्यांनी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम स्विकारण्यास नकार दिला. त्यावरून आज दिनांक ०१/०४/२०२५ रोजी पो.स्टे. बल्लारशाह, जि. चंद्रपूर येथे आरोपी लोकसेवक यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु असुन अभय अर्जुन गायकवाड, तहसीलदार याना ताब्यात घेण्यात आले असुन तलाठी सचिन रघुनाथ पुकळे हे रजेवर असल्याने शोध पथक रवाना करण्यात आले. सदर हि कार्यवाही ही डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, श्री. सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टाफ पो.हवा. रोशन चांदेकर, हिवराज नेवारे, पो.अं. अमोल सिडाम, प्रदिप ताडाम व चापोशि सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या