Ticker

6/recent/ticker-posts

वाढवणा पोलिसांनी फिल्मस्टाईल पाठलाग करुन पकडली गुटखा वाहतूक करणारी कार ; दोन फरार.!


——————————————
९४९५९०/-रुपयांचा मुद्येमाल जप्त..
———————————————
 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-वरीष्ठ पोलीस अधिका-यांचे आदेश व जिल्हाभरात फिरणारे विविध पथकं यामुळे पोलीस यंञणा अलर्ट झाल्याचे दि.३१ मार्च रोजी वाढवणा ठाण्यातील "जाॅंबाज" पोलीसांनी सर्वसामान्य जनता व अवैध धंदेवाले यांना आपल्या धडाकेबाज कार्यातून दाखवुन दिले आहे.
या बाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की,राज्यात साठवनूक व विक्री करण्यास बंदी असलेला गुटखा व सुगंधीत तंबाखु,जर्दा याची वाहतूक करणारी १ कार वाढवणा मार्गे अहमदपुरकडे जात असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने दिल्याने दि.३१ रोजी माहिती मिळालेल्या वर्णनाची मारुती कंपनीची स्वीफ्ट डिझायर एम.एच.४६ बी.ए. २१४३ या नंबरची १ कार वाढवणा पाटीवर दिसताक्षणी त्यातील चालकास कार थांबविण्याचा इषारा केला असता त्या चालकाने वाढवणा पाटीवरुन पोलीसांनाच "कट" मारुन ती कार फिल्मस्टाईल पळवली.आणि त्या कारचा वाढवणा पोलीसंनी पण फिल्म स्टाईलने पाठलाग केला.तेंव्हा कुठे दि.३१ रोजी ३.३० वा.वाढवणा खुर्द ते बेळसांगवी जाणारा पाणंद कच्च्या रोडवर कार सोडून आतील इसमाने पलायन केले.तद्नंतर त्या कारची झाडा-झडती घेतली असता अन्न सुरक्षा आयुक्त,मुंबई यांनी गुटखा,सुगंधीत तंबाखु,जर्दा, पानमसाला व तत्सम पदार्थ हे मानवी आरोग्यास नुकसान पोहचविणारे,अपायकारक असलेने त्यांचे उत्पादन,साठवणूक,वाहतूक व विक्री करण्यास बंदी घातलेला विमल पानमसाला,व्ही-१ तंबाखु या नावाचा २४९५९०/- रु.चा गुटखा त्या कार मध्ये आढळुन आला. तसेच ७ लाख रुपयाची कार ही आढळुन आली.असा एकुण ९४९५५९/- रु.चा मुद्देमाल जप्त केला. म्हणुन पोहेकाॅ.टी.टी.बळदे यांनी फिर्याद दिलेवरुन वाढवणा पो.स्टे. मध्ये गुरनं.८५/२५ कलम-१२३ , २२३, २७४,२७५ बीएनएस सह कलम -५९ अन्न सुरक्षा मानदे कायदा-०६ याप्रमाणे अज्ञात दोन इसमांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.याचा पुढील तपास पोलीस उप. निरीक्षक टी.कोरके करत आहेत.
*गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहिती प्रमाणे आलेल्या कारला थांबण्याचा प्रयत्न करणा-या पोलीसालाच कट मारुन जाॅंबाज पोलीसाचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न त्या कार मधील चालकाने केला होता. अशी चर्चा दि. ३१ रोजी वाढवणा पाटीवर होती*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या