चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :- कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा भंडारा ची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २९/३/२०२५रोज शनिवारला संपन्न झाली.सभेचे अध्यक्ष श्री माधव फसाटे होते.सर्वप्रथम दिप प्रज्वलन सर्व पदाधिकारी यांच्या कडून करण्यात आले. दिवंगत संघटना सभासदांना श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक मा श्री रामभाऊजी येवले संघटना कार्याध्यक्ष यांनी केले.त्यांनी संघटनेचे उद्दिष्ट स्पष्ट करून संघटनेच्या कार्याची माहिती विषद केली व संघटना वाढीसाठी जोमाने कार्याला लागण्याचे आवाहन केले.अहवाल वाचन सचिव श्री रत्नाकर तिडके केले.सभेत अहवालास मंजुरी प्राप्त झाली.आर्थिक जमाखर्च अहवाल वाचन उपाध्यक्ष श्री रामदास डोकरीमारे यांनी केले.सभेने एकमताने मंजुरी दिली. वयाचे ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ७ सभासदांचे पदाधिकाऱ्यांचे हस्ते सत्कार करण्यात आले.
सत्काराला उत्तर श्री निळकंठ हुमणे व श्री केवळराम ठवरे यांनी देतांना संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली व संस्थेच्या प्रगतीसाठी सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.दुसऱ्या सत्रात मा अतुल वर्मा संस्थेचे सल्लागार यांनी संघटनेचे महत्व या विषयावर विस्तृत असे मार्गदर्शन केले, मा श्री डॉ. मानकर सदस्य यांनी ज्येष्ठांनी आरोग्य जीवनशैली सांभाळण्याचा गुरुमंत्र दिला.तसेच श्री जाधवराव साठवणे,श्री शेख, श्री खान यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष माधव फसाटे यांनी अध्यक्षीय भाषण केले .आभार प्रदर्शन मा श्री के. झेड.शेंडे संस्था सहकार्याध्यक्ष यांनी केले.अल्पोपहरांती सभेची सांगता झाली.सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचालन संघटनेचे सहसचिव श्री प्रेमलाल लांजेवार यांनी केले,सुंदर संचालनाने कार्यक्रमाला चांगली रंगत आली.

या सभेला कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना पदाधिकारी उपाध्यक्ष श्री केवट,श्री राजपूत,श्री वरकडे,श्री वामनराव गोंधळे,शाम कुकडे ,पुरूषोत्तम समरीत,सुभाष तागडे, ई मान्यवर उपस्थित होते व त्यांनी संघटनेची सदस्यता ग्रहण केली व इतर सर्व सदस्य ,सल्लागार मंडळी व आजीवन सभासद ही बहू संख्येने उपस्थित होते.सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या व आभार मानले.

0 टिप्पण्या