चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : येथील स्थानिक नगरपरिषदेच्या सभागृहात विकास कामाची आढावा बैठक पार पडली या प्रसंगी आमदार करण देवतळे आणि मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. विशाखा शेळकी यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. करण देवतळे यांनी या सभेत नगरपरिषदे अंतर्गत सुरु असलेल्या विविध विकास कामाचा आढावा घेतला मार्ग नाल्या, सभागृह, अतिक्रमण होऊ नये याकरिता खुल्या जागेला वॉलचे बांधकाम करणे पाणीपुरवठा विभागातर्फे कामे नवीन दोन पाणीपुरवठा योजना, विध्दुत विभागातर्फे विध्दुतीकरणाचे कामे, पंतप्रधान आवास योजनेद्वारे नगरपरिषद क्षेत्रात घरकुलाचे बांधकाम त्या बाबतचा प्रगती अहवाल, नगरपरिषद क्षेत्रात विध्यार्थ्यांना ई- लायब्ररी तयार करणे आणि इतर कामाची माहिती घेतली तसेच विविध विकास कामाकरिता निधीची उपलब्धता करुन देण्याबाबत शासन स्तरावर स्वतःप्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, माजी नगराध्यक्ष संतोष आमणे, इतर माजी नगरसेवक, प्रतिनिधी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सुत्र संचालन नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी विजयकुमार जांभुळकर व आभार प्रदर्शन मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांनी केले
0 टिप्पण्या