चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : घोडपेठ ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेला पुनर्वसित सायवान येथील गावकरी गेल्या कित्येक वर्षांपासून विविध शासकीय योजनांपासून वंचित आहे.
या गंभीर प्रकाराची चौकशी करून सायवन येथील गावकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी भाजपच्या ग्रामीण तालुकाध्यक्षा रक्षिता निरंजने व ग्राम पंचायत सदस्य देवा शंकावार यांच्या नेतृत्वात सायवन येथील गावकऱ्यांनी घोडपेठ ग्रामपंचायतीला निवेदन सादर केले आहे. तीस वर्षांपूर्वी सायवन गावाचे घोडपेठ ग्रामपंचायती अंतर्गत गट ग्रामपंचायत म्हणून पुनर्वसन करण्यात आले. मात्र येथील गावकऱ्यांना अद्याप घराचे पट्टे मिळालेले नाही. सुरुवातीच्या काळात घर टॅक्स पावती देण्यात येत होती, मात्र गेल्या दहा वर्षांपासून तीही देणे बंद करण्यात आले आहे. गावकरी घरकुल योजना तथा शासनाच्या इतर सुविधांपासून वंचित झाले आहे.तर गावात प्राथमिक सुविधा उपलब्ध नसल्याने येथील गावकऱ्यांना त्याचा त्रास सोसावा लागत आहे. गेल्या 30 वर्षांपासून या सर्व समस्या येथील गावकऱ्यांना भेडसावत आहे. मात्र याकडे अद्याप शासकीय व राजकीय प्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेता येथील गावकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना भाजप ग्रामीण तालुका अध्यक्षा रक्षिता निरंजने, देवा शंकावार, सरोज रामटेके, वैशाली तलांडे, सुनील जुनघरे, लीलाधर राऊत, छाया तलांडे, सुरज रामटेके, अनिल जुमनाके, प्रवीण मेश्राम, आशिष नगराळे, शुभम खोब्रागडे, नितीन नगराळे, मुरलीधर ताजने, प्रतिभा रायपुरे, बिंदू रत्नपारखी,अरुण पेंदोर,पत्रु गेडाम आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या