Ticker

6/recent/ticker-posts

"कर्मयोगी आबासाहेब" चित्रपटाला "दादासाहेब फाळके पुरस्कार"

दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या शिरपेचात मानाचा तुरा


चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-सोलापूरचे भूमिपुत्र गेल्या काही वर्षापासून पुणे येथे स्थायिक झालेले अल्ताफ दादासाहेब शेख यांनी लेखन व दिग्दर्शन केलेला शेतकरी कामगार पक्षाचे नेते, आमदार, माजी मंत्री दिवंगत गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या आयुष्यावर आधारित  कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाला चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्त्वाचा आणि मानाचा असा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतून अभिनंदन होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अल्ताफ दादासाहेब शेख यांनी मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीत एक यशस्वी लेखक, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाला आत्तापर्यंत तीस पेक्षा जास्त राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. तसेच तिकीट खिडकीवर सुद्धा चांगले यश मिळाले आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटाने अनेक विश्व
रेकॉर्ड ही केले आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच अम्सटरडॅम लिफ्ट ऑफ आणि क्राउनवूड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाची गिनीज बुक आणि हाई रेंज ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लंडन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. तसेच बेंगलोर-इंटरनॅशनल पॅनोरामा फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड, थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड, यु.के.सिडनी-लिफ्ट ऑफ फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड, लाहोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड, स्विडन-फायनलिस्ट फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड, क्राऊन वूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड, भारत नॅशनल ऍवॉर्ड, स्पेशल ज्युरी ऍवॉर्ड, Tamizhagam आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड, गोल्डन लायन फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड, वेस्टन युरो फिल्म फेस्टिवल (बेस्ट डायरेक्टर) इत्यादी मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. आता चित्रपटसृष्टीतील सर्वात मानाचा आणि महत्त्वाचा असा दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाला जाहीर झाला असून येत्या १ मे २०२५ रोजी दिल्ली येथे भव्य कार्यक्रमात आणि मान्यवरांच्या उपस्थित पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यामुळे चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या