चित्रा न्युज प्रतिनिधी
धुळे:-अवैध वाळू वाहतूक बाबत तहसील कार्यालयात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार शिरपूर यांनी अवैध गौण खनिज वाहतुकी विरुद्ध पथक तयार केले, सदरच्या पथकाने गेल्या दोन दिवसात अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर कारवाई करून पकडण्यात आले आहेत व एका ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल केला आहे
एक ट्रॅक्टर लोंढरे भागात भरारी पथकास आढळून आले सदरचे ट्रॅक्टर पुढील कारवाईकामी जप्त करून तहसील कार्यालय शिरपूर येथे जमा करण्यात आले. तसेच एक ट्रॅक्टर दिनांक 25/04/2025 रोजी मौजे वाडी ता. शिरपूर गावाच्या रस्त्यावर विना क्रमांक असलेले लाल रंगाचे ट्रॅक्टर व ट्रॉली अवैद्य गौण खनिज वाहतूक करतांना भरारी पथकास आढळून आले, सदरचे ट्रॅक्टर जप्त करून पुढील कारवाईकामी तहसील कार्यालय शिरपूर येथे जमा करण्यात आले.
तसेच दिनांक २६/४/२०२५ रोजी अवैद्य गौण खनिज वाहतूकीवर आळा घालणे कामी तयार केलेल्या भरारी पथक सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक 52 सांगवी ते पळासनेर रोडवर पन्हाखेड गावाजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळून आले सदरच्या ट्रॅक्टरची तपासणी करतेवेळी वाहन चालक वाहन घेऊन तेथून पसार झाला. त्यामुळे संबंधिताविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अशा एकूण तीन वाहनांवर तहसील कार्यालय शिरपूर मार्फत दंडात्मक तसेच गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे अशाच प्रकारे या पुढील काळात देखील अवैध वाळू वाहतुकी विरुद्ध सक्तीची कारवाई करण्यात येणार आहे
सदरची कारवाई शरद मंडलिक उपविभागीय अधिकारी शिरपूर, महेंद्र माळी तहसीलदार शिरपूर यांच्या मार्गदर्शनाने नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी व तलाठी यांचे पथकाच्या साह्याने करण्यात आलेली आहे,
0 टिप्पण्या