चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई : पहलगाम, जम्मू काश्मीर येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अकोला आणि उर्वरित महाराष्ट्रातील अनेक पर्यटक तिकडे अडकले होते.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ह्या अडकलेल्या पर्यटकांना सरकारने सुखरूप लवकर परत आणावे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून विमानाची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. त्यानंतर राज्य शासनाने तातडीने विमानाची व्यवस्था करून त्यांना मुंबईत आणण्याची व्यवस्था केली.
आज मुंबई विमानतळावर ह्या सर्व पर्यटकांचे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी स्वागत केले. यावेळी ह्या सर्व पर्यटकांनी बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे आभार मानले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, सुनीताताई गायकवाड, चेतन अहिरे, साक्षीताई धोत्रे, स्नेहल सोनी कृतिका जाधव, संतोष अंबुलगे, सतीश राजगुरू, अंबरसिंग चव्हाण, सागर गवई, रवी प्रधान, नितीन शीलवंत, मौलाना अब्बास रिजवी, मौलाना जाफर रिजवी, आकिफ दफेदार, कमलेश उबाळे उपस्थित होते.
0 टिप्पण्या