वंचित बहुजन आघाडीची घटनास्थळी धाव!
चित्रा न्युज प्रतिनिधी
परभणी : सोनपेठ तालुक्यातील शेळगाव या गावी मातंग समाजाच्या एका अल्पवयीन मुलाला जातीय शिविगाळ करून शाळेत बेदम मारहाण करण्यात आली होती. यात त्या तरुणाच्या चेहऱ्यावर प्रचंड मोठ्या इजा झाल्या होत्या.
वंचित बहुजन आघाडी, परभणी जिल्ह्याच्यावतीने पीडित कुटुंबाची भेट घेण्यात आली. कुटुंबियांना धीर देत वंचित बहुजन आघाडी परिवारासोबत असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष सुनील मगरे यांनी केले.
पीडित तरुण ११ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे, त्याला जातीयवादी प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांनी जबर मारहाण केली होती. न्यायालयीन लढाईत परिवाराला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही वंचित बहुजन आघाडीच्या टीमने दिली. बाळासाहेब आंबेडकर व जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व टीम आपल्या सोबत आहे आपण कुणालाही न घाबरता न्यायालयीन लढा पुढे चालू ठेवावा.
कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आम्ही आपल्यासोबत खंबीरपणे गुन्हेगारांना शिक्षा मिळेपर्यंत सोबत राहू. आपल्या परिवाराला व ज्याच्यावर हल्ला झाला त्या पीडिताला न्याय मिळवून देऊ, अशी खात्री कुटुंबाला देण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडी परभणी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, उत्तरचे युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाडे, सोनपेठचे वरिष्ठ नेते रुस्तम तुपसमुद्रे, कल्याण वाघमारे, संजय श्रीखंडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या