चित्रा न्युज प्रतिनिधी
कामठी:- तालुक्यातील लिही गाव येथे धम्म संगिनी बुद्धविहार लोकार्पण सोहळा, तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण सोहळा दिनांक-20/04/2025 रोज रविवारला मोठ्या उत्साहात पार पडला, सर्वप्रथम अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विज्ञानवादी विचार मांडून समाज प्रबोधन गीत सादर केले त्यांच्या सत्कार करण्यात आला, यावेळी ग्रामपंचायत सरपंच अस्मिता खांडेकर, भदंत नाग दीपंकर महाथेरो, सुनंदा कांबळे, सविता नारनवरे, विशेष फुटाणे, सुधाकर पाटील, प्रकाश लांजेवार, युवराज अडकणे, रमेश रामटेके, रुपेश सोमकुवर, रवींद्र बोरकर, गुलाबराव चंदनखेडे, रोहित खांडेकर पोलीस पाटील, प्रफुल गजभिये, निलेश खांडेकर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बोरकर यांनी केले, मोठ्या संख्येने गायक कलावंत उपस्थित होते


0 टिप्पण्या