Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळीत सर्वञ वाहतूक व्यवस्थेचा वाजला "बॅंण्डबाजा"

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर:-उदगीर शहरानंतर या तालुक्यात सर्वात मोठे व राज्य मार्गालगत मोठी बाजारपेठ असलेल्या हाळीहंडरगुळी   या गावात सगळीकडे हजारो छोटी - मोठी वाहने येत-जात असतात.त्या पैकी शेकडो वाहने कुठेही व कशीही *पार्क* केलेली असतात.यामुळे कधी व कसा अपघात होईल याचा भरोसा नाही.येथे वाहतूक व्यवस्थेचा 'बॅंण्ड" वाजल्याचे सामान्य जनतेला दिसते. तेंव्हा या अशा वाहतूकीवर योग्य ती कारवाई करु,असे शांतता समिती च्या बैठकीत म्हणणारे गप्प का ?  असा प्रश्न सुजान हाळी- हंडरगुळी करांमधून चर्चीला जात आहे.
उदगीर शहरानंतर या तालुक्यातले सर्वात मोठे गाव व बाजार पेठ असलेल्या हाळी-हंडरगुळी येथे या परिसरातील ५०/६० गावातील सर्व सामान्य जनता विविध कामानिमित्य ये-जा करतात.व त्यापैकी अनेकजन  त्यांच्याजवळील गाडी वेडी-वाकडी कुठेही "पार्क" करत असल्यामुळे या रोडवर सतत ट्रॅफिक जॅम होते.तसेच  यामुळे अपघाताची शक्यताही नाकारत येत नाही.आणि या जिवघेण्या बेशिस्त वाहतूकीबद्दल अनेकदा पोलीस चौकीत शांतता समितीच्या बैठकीत हाळी व हंडरगुळीतील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले असता, सपोनी यांनी फक्त कारवाई करण्याचे आश्वासन दिले.व ते देऊन वर्ष झाला तरीही बेशिस्त वाहतूकीवर कारवाई कांही केली नाही. कारवाई करण्याची "डेअरींग" नाही का?तसेच येथील बेशिस्त वाहनांना शिस्त कधीच लागणार नाही का?असे संतप्त सवाल या वाहनांमुळे ञस्त झालेली हाळी-हंडरगुळीकर जनता संबंधित प्रशासनाला विचारत आहे.
———————————————
याबाबत शांतता समितीच्या बैठकीत कारवाई करणार!असे शब्द,आश्वासन दिलेलेच कारवाई करण्याची "डेअरींग" करत नाहीत.तिथे आम्ही काय करणार?असा सवाल एका पोलीस कर्मचा-याने नाव ओपन करायचे नाही!या एका अटीवर उपस्थित केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या