सोलापूर:-बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात एका अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता होण्याची घटना घडली असून, यासंदर्भात बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिची मुलगी सकाळी घरात होती. कुटुंबातील सदस्य आपापल्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त असताना, सकाळी १०:०० ते ११:०० या दरम्यान ती अचानक घरातून निघून गेली. तिच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो बंद लागत असल्याने कुटुंबीयांनी गावात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, कुठेही माहिती न मिळाल्याने तक्रारदार व त्यांच्या पतीने बार्शी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
पोलीसांनी तक्रारीची दखल घेत बी.एन.एस. कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सदर प्रकरणाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस विविध दिशांनी तपास करत असून, संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली जात आहे.
या प्रकरणात नागरिकांनी कोणतीही महत्त्वाची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.


0 टिप्पण्या