चित्रा न्युज प्रतिनिधी
अकोला : अकोला तालुक्यातील उगवा सर्कल येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनांतर्गत स्वाक्षरी मोहीम अभियान नुकतेच यशस्वीरीत्या पार पडले. या अभियानाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, अकोला तालुका प्रसिद्धी प्रमुख मोहन तायडे, अरविंद शिरसाट, मनोज शिरसाठ, निलेश शिरसाठ, सुभाष वाघ, शुद्ध धन शिरसाट, सतीश वाघ, वैभव शिरसाट, जीवन भातकुले, रंजीत शिरसाट, सिद्धार्थ शिरसाट, पहलवान विश्वजीत शिरसाट, संजय वाघ, आशिष सरदार, विलास इंगळे, विकी चौतमाल, वैभव टोपरे, सुबोध डोंगरे, स्वप्निल लाला शिरसाट, सारंगधर डोंगरे, आशिष शिरसाट, नितीन शिरसाट, पंकज भातकुले, किरण वाघ, कुलदीप डोंगरे, सत्यशील शिरसाट, सुनील वाघ, पंकज शिरसाठ, सतीश शिरसाठ, संदीप अनिकेत शिरसाट, सतीश थोरात, योगेश खरात, अमोल सुर्वे आणि उगवा गावातील अनेक मंडळी उपस्थित होती.
या मोहिमेद्वारे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मोठ्या संख्येने स्वाक्षऱ्या संकलित करण्यात आल्या. उपस्थितांनी या आंदोलनाच्या उद्दिष्टांना पाठिंबा दर्शवत पुढील कार्यवाहीसाठी एकजुटीने सहभागी होण्याचा संकल्प केला.
0 टिप्पण्या