Ticker

6/recent/ticker-posts

"हर घर मे अब एक ही नाम,एक ही नारा गुंजेगा;जय,जय श्रीराम" च्या गजरात दुमदुमली हंडरगुळी नगरी..

——————————————
चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-श्रीराम नवमी निमित्ताने दि.८ एप्रिल रोजी उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या गावात डी.जे.च्या दणदणाटामध्ये व फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आणि "हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गुंजेगा,जय श्रीराम"च्या गजरात भव्यदिव्य अशी शोभायाञा {मिरवणुक} काढण्यात आली होती. व या मिरवणुकीचे हाळीपरिसरातील  हजारो जनतेनी व पावसाने भव्य पण स्वागत केले.ही मिरवणुक मोठ्या जल्लोषात व मंगलमय आणि शांततामय वातावरणात कायद्याचे काटेकोरपणे पालन करत संपन्न झाली.यावेळी पोलीस बंदोबस्त मोठा ठेवण्यात आला होता.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्रीरामनवमी च्या 3-या दिवशी शोभायाञे काढली जाते.यामध्ये सजवलेल्या सात 8 ट्रॅक्टरमध्ये श्रीराम,हणुमान,वाल्मिक रुषी,छ.शिवाजी महाराज,छ.संभाजी महाराज,भारत माता,यांच्या पुतळ्या सह एका युवकाने केलेला छञपती संभाजी महाराज यांचा साखळ —दंडातील जिवंत देखावा तसेच एका युवकांनी केलेला हणुमानाचा तसेच राम,लक्ष्मण,सीता यांचा ही सादर केलेला जिवंत देखावा हरएकाचे मन वेधून घेत होता.
हि मिरवणुक बघण्यासाठी घराच्या गच्चीवर,टेरेसवर तसेच गल्लोगल्ली मधील रस्त्याच्या तसेच राज्यमार्गा च्या दुतर्फा हजारोंच्या संख्येत अनेक धर्मिय नागरीकांनी तोबा गर्दी केलती     यावेळी मिरवणुकीवर जागोजागी फुलांचा वर्षाव करण्यात आला.ही मिरवणुक एवढी भव्यदिव्य होती की बघणा-या शेकडो जणांनी याचे मोबाईल चिञण केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या