Ticker

6/recent/ticker-posts

अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांचा जाहीर निषेध.........



चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:- महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतेच शेतकऱ्याबद्दल अपशब्द बोलून  शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून शेतकऱ्यांना अपमानित केल्याने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. व जिल्हा अधीक्षक रोहिणी पाठराबे यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले की शेतकऱ्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या व शेतकऱ्याची चेष्टा करणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना तत्काळ मंत्रीपदावरून हठविण्यात यावे. असे निवेदनअन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडारा अध्यक्ष चंद्रशेखर भीवगडे, कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, सचिव पुरुषोत्तम गायधने , उपसरपंच दीपक खंदाळे, शशिकांत गंगने यांनी दिले यावेळी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या