Ticker

6/recent/ticker-posts

पवनी तालुक्यातील वृध्द,अपंग,महिला लाभार्थ्यांना होत असलेल्या त्रासा बद्दल तहसीलदार ला दिले पत्र


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा:-पवनी तालुक्यातील अनेक गावातील महिला व वृध्द लाभार्थ्यांना (निराधार, श्रावणबाळ,दिव्यांग ई.) आपल्या कामा निमित्त पवनी तहसील कार्यालयात यावे लागते.कधी काम होते तर कधी आवश्यक कागदपत्र अभावी वेळेवर काम होत नाहीत.वृद्धांना हातात उचलून तर अनेक महिला आपल्या तांन्हूल्या बाळांना कुशीत घेवून उन्हा_तान्हात कार्यालयात येत असतात.वरून लांब लचक गर्दी .
नुकतेच तहसील कार्यालयात कामा निमित्त आले असता हे दृश्य पहावयास मिळाले.त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.लाभार्थ्यांना या त्रासा पासून मुक्ती मिळावी व त्यांचा गावतच किंवा ग्रा.प. असलेल्या ठिकाणी तहसील कार्यालय कडून कॅम्प लावून लाभार्थ्यांना मदत करण्यात यावी या बद्दल अड्याळ ग्रां. पं.सदस्य व सामा.कार्यकर्ता सोहेल खान, ग्रिन हेरिटेज चे अध्यक्ष सईद शेख(भंडारा)जुबेर खान(अड्याळ )ई नी या समस्या बाबत तहसीलदार मा.महेंद्र सोनोने यांचे शीं चर्चा करून निवेदन दिले.तहसीलदार महोदय ने पत्राची दखल घेऊन तत्काळ निर्णय घेत संबंधित ग्राम पंचायतींना गावनिहाय शिबिराचे नियोजन करण्यास आदेशित केले आणि दुसऱ्या दिवशी या बाबत ग्रा. प.ना पत्र ही प्राप्त झाले.  महिला,वृद्धांचे  वेळेवर कामे होण्यास  मदत होईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या