Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर ग्राम पंचायत धनेगाव बांधकाम न करता पैसे लाटत आहेत, चौकशी करावी,


विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

नांदेड -ग्राम पंचायत धनेगाव  
येथील लाभार्थींना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहेत काही लाभार्थी नौकरी करणारे आहेत व एका घरात चार ते पाच घरकुल मंजूर झालेले काही लोकांना आधी च दोन मजली पक्के घर बांधलेले, आहेत त्यांची नियमानुसार चौकशी करावी गरिब लाभार्थ्याची चौकशी करून ग्रामपंचायत ने ठराव मंजूर केले आणि जे नौकरी करणारे दोन मजली पक्के घर बांधलेले किंवा ज्या लाभार्थी नी बेसमेट ही केले नाही, दुसर्याच्या बेसमेट केलेल्या घरांचे फोटो काढून पाठवले त्यांना दुसर्या हप्त्याचे पैसे मंजूर झाले ते कसे झाले नियमानुसार बांधकाम केलेलें आहे का!याची चौकशी इंजिनिअर मार्फत करुन मगच त्याचा प्रस्ताव वर पाठवला जातो पैसे मंजूर करण्यात येतात इंजिनिअर पंचायत समिती मध्ये आठवड्यात एक दोन वेळा हजेरी लावतो कधीही जाग्यावर जाऊन पाहणी करत नाही त्यामुळे ह्या घरकूल धारकांचे फावल्या जात आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरे लाभार्थी कोण आहेत,खरच त्यांचे कच्चे घरं आहे का,! बांधकाम सुरू आहे का! शासकीय नौकरी आहे का! याची चौकशी करून मगच खर्या लाभार्थींना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, आणि 
काही उंच निच घोटाळा आढळल्यास कारवाई करावी, अशी मागणी जनतेने केली आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या