चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई: थोरियम अणुभट्टी विकासासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाजेनको, रशियाची रोसातोम (ROSATOM) शासकीय कंपनी स्मॉल मॉड्युलर रिऍक्टर विथ थोरियम फ्युएल यांच्यामध्ये सहकार्य पत्रावर स्वाक्षरी करण्यात आली.
महाराष्ट्रात थोरियम रिऍक्टरचे संयुक्त विकास करणे,अणुऊर्जा नियामक मंडळ (AERB) च्या सुरक्षा निकषांनुसार थोरियम रिऍक्टरचे व्यावसायिकीकरण करणे, “मेक इन महाराष्ट्रा” उपक्रमांतर्गत थोरियम रिऍक्टरसाठी असेंब्ली लाईनची स्थापना करणे हा या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश आहे.महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), स्मॉल मॉड्युलर रिऍक्टर विथ थोरियम फ्युएल(Small Modular Reactor with Thorium fuel)च्या संयुक्त विकासाला धोरणात्मक पाठबळ देतील.भारत सरकार व अणुऊर्जा नियामक मंडळ (AERB) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे सर्व काम होणार आहे.
या प्रकल्पासाठी परस्पर समन्वयातून व अभ्यासातून संयुक्त कार्यगट काम करेल. या कामासाठी सहकार्य पत्रावर स्वाक्षरी झालेल्या संस्थांचे प्रतिनिधी , महाजेनको, रोसातोम एनीर्जी प्रोजेक्ट (Rosatom Energy Projects), मित्रा (MITRA) आणि ग्लोबल टेक्नॉलॉजी अलायन्स (Global Technology Alliance) या संस्थांच्या अधिकृत प्रतिनिधींचा सहभाग असेल. या कराराची अंमलबजावणी करताना अणुऊर्जेच्या वापर ,विकास याबाबतीत सर्व कायदेशीर तरतुदी व भारत सरकारने ठरवलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बंधनकारक असेल.
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधानसचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी,मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, प्रभारी अपर मुख्य सचिव ऊर्जा संजय खंदारे, रशियाचे प्रतिनिधी मुंबईचे रशियन फेडरेशन चे महावाणिज्यदूत इव्हान वाय. फेटिसोव्ह,भारत व रोसातोम चे भारतातील प्रतिनिधी काउन्सेलर रशियन दूतावासचे युरी ए. लायसेन्को, संचालक, प्रकल्प विभाग (दक्षिण आणि दक्षिण-आशिया क्षेत्र) अलेक्झांद्रे वोल्गिन, आरईपीचे प्रकल्प व्यवस्थापक दिमित्री गुमेन्निकोव्ह , महाजेनको (MahaGenCo) चे संचालक (वित्त) बाळासाहेब थिटे, संचालक(प्रकल्प) अभय हरणे, मुख्य अभियंता अतुल सोनजे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, अमन मित्तल, मित्राचे सहसचिव प्रमोद शिंदे,अणुऊर्जा विभागाचे (DAE)चे सहसचिव नितीन जावळे,ग्लोबल टेक्नॉलॉजी अॅक्शन (GTA) चे किशोर मुंदर्गी यावेळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या