Ticker

6/recent/ticker-posts

हॉस्पिटलमधून चोरीस गेलेले मोबाईल बार्शी पोलिसांकडून काही तासांत हस्तगत ; दोन आरोपींना अटक


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-बार्शी शहरातील प्रसिद्ध हिरमठ हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातवायकाचे मोबाईल चोरीला गेल्याच्या गुन्ह्यात बार्शी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केवळ काही तासांत चोख तपास करून दोन आरोपींना अटक केली असून चोरी गेलेले तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. एकूण जप्त मुदतमेहलाची किंमत रु. १,४८,०००/- एवढी आहे.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी महेश अरविंद यादव, रा. सुभाषनगर, बार्शी हे आपल्या पत्नीवर उपचार सुरू असल्याने हिरमठ हॉस्पिटल, बार्शी येथे रूम क्रमांक ०५ मध्ये थांबले होते. उपचारादरम्यान पहाटेच्या सुमारास ते झोपेत असताना टेबलवर ठेवलेले तीन मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या प्रकरणी त्यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून गु. र. क्र. ५०५/२०२५, भारतीय दंड संहितेचे कलम ३०५(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तातडीने तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री. बालाजी कुकडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत कुंजीर व त्यांच्या डीबी पथकाला आवश्यक त्या सूचना दिल्या. तपासादरम्यान पोलिसांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले. त्यातून संशयित आरोपी सुदर्शन राजू डोंगर (वय २४, रा. लोकमान्य चाळ, लातूर रोड, बार्शी) हा पूर्वीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला इसम असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी तातडीने सुदर्शन डोंगर याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात त्यासोबत विनायक सतीश देवकर (वय २३, रा. टिळक चौक, बार्शी) याने सहभाग घेतल्याचे सांगितले. दोघांची अंगझडती घेतली असता चोरी गेलेले तीन मोबाईल फोन, अंदाजे किंमत रु. १,४८,०००/- असा मुदतमेहज जप्त करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जालिंदर नालकुल (बार्शी विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या तपासात पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील खालील अधिकारी व अंमलदार सहभागी होते:

सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत कुंजीर
सपोफौ अजित वरपे,पोहेकॉ. अमोल माने (1667)
पोहेका. बाबासाहेब घाडगे (193), पो. ना. संगाप्पा मुळे (759), पो. कॉ. सचिन देशमुख (1974), पो. कॉ. अविनाश पवार (787), पो. कॉ. सचिन नितनात (1995)
पो. कॉ. राहुल उदार (200),पो. कॉ. प्रल्हाद अकुलवार (2021),चपोकॉ. रामेश्वर मस्के

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ. अमोल माने (1667), बार्शी शहर पोलीस ठाणे हे करत आहेत.

या तात्काळ व यशस्वी कारवाईमुळे पोलिसांविषयी जनतेत विश्वास वाढला असून, गुन्हेगारांना रोखण्यासाठी पोलिसांचे हे कार्य कौतुकास्पद आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या