Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना शिंदेगटाची अतिक्रमित कार्यालये हटवा,आदिवासी संघटनांची मागणी


उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
शहादा : नंदुरबार येथील नंदुरबार- धुळे चौफूली येथील कब्रस्थानच्या बाजूला,नंदुरबार -दोंडायचा मुख्य रस्त्यावर व तळोदा येथील अमोल कोल्ड्रिंक च्या समोरील,तळोदा- शहादा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधण्यात आलेले शिवसेना शिंदेगटाची  कार्यालये तात्काळ हटवा व अतिक्रमण करून कार्यालये बांधणा-यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स, भारत आदिवासी संविधान सेना,भारतीय स्वाभीमानी संघ इत्यादी आदिवासी संघटनांकडून एका निवेदनाद्वारे  जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी शहादा यांना देण्यात आले. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,कार्याध्यक्ष रवींद्र वळवी,कार्यकर्ता सुनिल पवार, भारतीय स्वाभीमान संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,नंदूरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी,सामाजिक कार्यकर्ता योगेश गावीत, बिरसा फायटर्स तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,मालदाचे अशोक पावरा,प्रभूदत्तनगरचे अरूण पावरा,भारत आदिवासी संविधान सेनेचे अशोक ठाकरे,गणेश पवार, वसंत चौधरी आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
                     नंदुरबार येथील नंदुरबार-धुळे चौफूली येथे कब्रस्थानच्या बाजूला,नंदुरबार - दोंडायचा मुख्य रस्त्यावर व तळोदा येथील अमोल कोल्ड्रिंक च्या समोरील तळोदा-शहादा मुख्य रस्त्यावर शिवसेना शिंदेगटाचे कार्यालय हे रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधण्यात आले आहे.या कार्यालयांच्या अतिक्रमणामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक रहदारीस अडचणी निर्माण होत आहेत.अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या या कार्यालयात विद्युत वितरण कंपनीकडून वीज पुरवठा कोणत्या कागदपत्रांच्या आधारे करण्यात येतो? पाणीपुरवठा कोणत्या कागदपत्रांच्या आधारे करण्यात येतो? याची सखोल चौकशी करण्यात यावी.
                  शिवसेना शिंदेगटाचे विधानपरिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघूवंशी यांनी नंदूरबार जिल्ह्य़ातील आदिवासींच्या जमिनी तसेच महारवतन, ईनामी,सरकारी,गायचरण, राम मंदिराच्या जमिनी बेकायदेशीर, अवैद्य रित्या,बोगस पद्धतीने हडप केल्या आहेत. त्यामुळे चंद्रकांत रघुवंशीविरोधात नंदुरबार जिल्ह्य़ातील जनतेत तीव्र संताप निर्माण झाला आहे.आदिवासी संघटनांमार्फत ठिक ठिकाणी आंदोलन करून हडप केलेल्या जमिनी परत मिळाव्यात, म्हणून तीव्र आंदोलन सुरू आहेत. अशातच शिवसेना शिंदेगटाची नंदुरबार व तळोदा येथील कार्यालये रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधण्यात आली आहेत, ही एक गंभीर बाब आहे. जमिनींवर बेकायदेशीर कब्जा करणा-या पुढा-यांविरोधात दिवसेंदिवस सर्वसामान्य जनतेत तीव्र संताप निर्माण होत आहे.
                       महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई  दिनांक ७ सप्टेंबर २०१० व महाराष्ट्र शासन महसूल विभाग मंत्रालय मुंबई सन २०२८ च्या शासन परिपत्रकानूसार शासकीय जमिनीवरील अतिक्रमण,प्रतिबंधक, निष्काष्पित करणे,फिर्याद दाखल करणे नियमानुसार  नंदुरबार येथील धुळे चौफूली येथील व तळोदा येथील शहादा- तळोदा मुख्य रस्त्यावरील शिवसेना शिंदेगटाची अतिक्रमणात असणारी कार्यालये तात्काळ हटविण्यात यावीत व नियमानुसार अतिक्रमण करून कार्यालये बांधणा-यांवर फिर्याद दाखल करून कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी.हीच नम्र विनंती.अन्यथा आदिवासी संघटनांमार्फत अतिक्रमणात असणा-या नंदुरबार व तळोदा येथील शिवसेना शिंदेगटाच्या कार्यालयासमोरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा आदिवासी संघटनांकडून देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या