चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई :- पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादाचा खातमा करण्यासाठी सिंदुर ऑपरेशन यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्याचा अभिमान आणि अभिनंदन व्यक्त करण्यासाठी,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याला पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईत येत्या 29 मे रोजी सकाळी 11.30 वाजता चैत्यभुमी ते इंदुमिल अशी भारत जिंदाबाद यात्रा केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार आहे.चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विन्रम अभिवादन करुन ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भारत जिंदाबाद यात्रेला प्रारंभ करण्यात येणार आहे.चैत्यभुमी येथुन सुरु होणारी भारत जिंदाबाद यात्रा छत्रपती शिवाजी पार्क मैदान येथून मुख्य रस्त्याने येऊन इंदुमिल येथे भारत जिंदाबाद यात्रेचा समारोप होणार आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या वतीने गोराई बे व्हयु हॉटेल येथे आज भारत जिंदाबाद यात्रेच्या नियोजनाची बैठक आयेजित करण्यात आली होती.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. ऋषी चिंतामण माळी स्वागत अध्यक्ष होते.राष्ट्रीय सरचिटणिस अविनाश महातेकर, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे, बाळासाहेब गरुड विवेक पवार ज्येष्ठ नेते कमलेश यादव श्रीकांत भालेराव; उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड ; अजित रणदिवे ; संजय डोळसे तसेच अभया सोनवणे आदिंनी सभेत मार्गदर्शन केले.
पाकिस्तानने सुरु केलेला आंतकवाद नष्ट करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा निर्धार आहे. पाकव्याप्त काश्मिर भारताच्या ताब्यात घेतले पाहिजे.यासाठी पाकिस्ताशी थेट युध्द करावे लागले तरी चालेल.पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मिरमधील अतिरेक्याचे अड्डे भारतीय सैन्याने मोठ्या शौर्याने उध्दवस्त केले.भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा आम्हाला अभिमान आहे.आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीना देशभरातील दलितांचा पाठिंबा आहे.असे ना.रामदास आठवले म्हणाले.
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठि भारतीय सैन्याला पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तिरंगा ध्वज हाती घेऊन भारत जिंदाबाद यात्रा येत्या 2
0 टिप्पण्या