१५ वर्षे एकाच टेबलावर बसणा-यांची बदली का करत नाहीत? सीईओ सावनकुमार यांच्या कार्यपद्धतीवर बिरसा फायटर्सने उठवले सवाल!
सुभाष मारणार जिल्हा परिषदला मारणार?
चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार : सुभाष मारणार वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी बाजीराव शिंदे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानगीपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांच्याकडून आंतरजिल्हा बदलीने नंदुरबार ते सोलापूर जाण्यासाठी सीईओच्या सहीची एनओसी देण्यासाठी तब्बल ९० हजार रूपये घेतल्याचा शिक्षकांच्या संभाषणाचा विडीओ सोशल मिडीयावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.त्यामुळे जिल्हा परिषद नंदूरबार मध्ये एकच खळबळ उडाली आहे.सुभाष मारणार हे गेल्या १३ वर्षांपासून जिल्हा परिषद नंदूरबारच्या वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर एकाच टेबलावर सीईओच्या आशीर्वादाने चिपकून बसले आहेत. सुनील नथा पाटील हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोगळपाडा तालुका नवापूर शाळेतील शिक्षक गेल्या १२ वर्षापासून जिल्हा परिषद नंदूरबारच्या पाणीपुरवठा विभागात एकाच टेबलवर चिपकून बसला आहे.
१३ ते १५ वर्षे एकाच टेबलावर चिपकून बसवलेले हे कर्मचारी जिल्हा परिषद मधील बदल्या करणे,बीले मंजूर करणे इत्यादी कामासाठी पैशे गोळा करण्याचे काम करतात,भ्रष्टाचाराची कामे करतात, म्हणून सीईओ यांची बदली करत नाहीत.एरव्ही शिक्षकांनी ५ ते १० वर्षांत बदली केली जाते.हा नियम या जिल्हा परिषद मधील कर्मचाऱ्यांना लागू नाही का? आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून या १३ ते १५ वर्षे एकाच टेबलावर बसणा-या कर्मचाऱ्यांची बदली करा,अशी सीईओ यांना निवेदनाद्वारे मागणी केली.दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी जिल्हा परिषद नंदूरबार समोर आदिवासी संघटनांनी मोर्चाही नेला.तेव्हा येत्या १५ दिवसांत मागण्यांबाबत कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते.पुन्हा आम्ही दिनांक २७ मे २०२५ रोजी सीईओ यांना निवेदन दिले व मागणी केली.परंतू सीईओ सावनकुमार यांचे टाळाटाळ करणारे उत्तर समाधानकारक वाटले नाही.सीईओ यांना आमचा सवाल आहे की,१३ ते १५ वर्षे एकाच टेबलावर बसणारे कर्मचारी तुमचे नातेवाईक आहेत का? ज्यांची तुम्ही बदली करत नाहीत! तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? की तुमचा यांच्यामुळे फायदा होतो?सीईओ च्या टेबलवर पैसे द्यावे लागतात, असे आरोप केले जातात. तेव्हा सीईओ च्या कामकाजावर प्रश्न चिन्ह निर्माण होतात. संघटनांच्या मागणीनंतरही सीईओ अशा भ्रष्टाचाराची बदली करत नसेल तर सीईओ सुद्धा यांच्या भ्रष्टाचारात शामिल आहे,अशी शंका निर्माण होते.म्हणून सीईओ आमच्या मागण्यांबाबत कार्यवाही करत नाहीत, म्हणून आम्ही दिनांक २ जून २०२५ रोजी जिल्हा परिषद नंदूरबार समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत. तरीही सीईओ यांना जाग येत नसेल तर सीईओने पद सोडाव, सीईओ च्या विरोधातच पुढील मोर्चा आम्ही काढणार आहोत,अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या