चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-वरठी येथील सनफ्लॅग कंपनीच्या परिसरात विश्व पर्यावरण दिनानिमित्त मियावाकी (घनदाट जंगल) प्लांटेशनचे उद्घाटन पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे आयोजन सनफ्लॅग कंपनीकडून करण्यात आले होते.
या वेळी कंपनीचे सीईओ बी. के. तिवारी, एच.आर. हेड सतीश श्रीवास्तव, समीर पटेल, जवाहरलाल गुप्ता, ग्रीन हेरीटेज पर्यावरण फाउंडेशनचे संस्थापक मो. सईद शेख, अशोक लेलँडचे प्लांट हेड राजेंद्र ठाकरे, एच. आर. हेड मरोटकर, पतंजली योग समिती व स्वाभिमान ट्रस्ट भंडाऱ्याचे डॉ. रमेश खोब्रागडे, रत्नाकर तिडके, यशवंत बीरे, प्रमोद सपाटे, मंजुषा डवळे, नंदा राहांगडाले, गायत्री परिवाराचे राजीव शक्करवार, मुकुंद भैरम, डी. एल. शुक्ला, सुरेंद्र सेलोकर, मोरेश्वर तिडके, नीता शक्करवार मॅडम, नारायणपुरे मॅडम तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
एसपी नुरुल हसन यांनी सनफ्लॅग कंपनीच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. नुरुल हसन, बी. के. तिवारी, सतीश श्रीवास्तव इत्यादी मान्यवरांच्या हस्ते झाडे लावण्यात आली आणि त्यांनी आपले विचारही मांडले.
पतंजली, गायत्री परिवार व इतर संस्थांच्या सहकार्याने विविध प्रजातींची व आयुर्वेदीक औषधींची झाडे जसे की अश्वगंधा, सर्पगंधा, निर्गुंडी, गुडमार इत्यादी झाडे लावण्यात आली. एकूण मिळून सुमारे ६ हजार झाडे लावण्यात आली.
यानंतर सनफ्लॅग कंपनीने आयोजित केलेल्या विदर्भस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन देखील एसपी नुरुल हसन यांच्या हस्ते, बी. के. तिवारी व सतीश श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. डॉ. रमेश खोब्रागडे यांनी एसपी साहेबांचा सत्कार अंगवस्त्र व औषधी वनस्पतीवरील पुस्तक देऊन केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश भूरे, इरशाद शेख, पूर्णेंदु सिंग (एच. आर.), सिक्युरिटी, युनियनचे विकास बांते, रविंद्र बोरकर, मिलिंद वासनिक तसेच नर्सरी, शाळा व कॉलनीवासीयांचे मोलाचे योगदान लाभले.
विश्व पर्यावरण दिनानिमित्त कंपनीतील कर्मचारी मोनी हरिजन, स्वाती मेहता, वंदना राऊत या मुलींनी प्लास्टिकमुक्त पर्यावरण ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून शीशमहल गेटजवळ सुंदर व आकर्षक रांगोळी काढली.
१० जून रोजी सनफ्लॅग कंपनीच्या स्मृतिवनात आपल्या प्रियजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ औषधी झाडे लावण्यात येणार आहेत. ज्यांना आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मृतित झाडे लावायची असतील, त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या