चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-बार्शी, दि. ८ जून २०२५: बार्शी शहरातील देशमुख प्लॉट परिसरातून १३ वर्षांचा मुलगा सकाळी घरातून बाहेर पडून अद्याप घरी न परतल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी जिल्ह्यातील सर्व ठाण्यांना शोध पत्रिका पाठवून अलर्ट जारी केला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या माहितीनुसार, हर्ष योगेश शर्मा (वय १३ वर्षे, रा. मल्लीकार्जुन मंदिराजवळ, देशमुख प्लॉट, बार्शी) हा मुलगा आज दि. ०८ जून २०२५ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून सायकल खेळण्यासाठी बाहेर गेला होता. मात्र तो बराच वेळ घरी परतला नाही. यानंतर त्याचे वडील योगेश जगदीशप्रसाद शर्मा (वय ४१ वर्षे) यांनी परिसरात शोध घेतला. तरीदेखील हर्षचा काहीही थांगपत्ता लागला नाही.
या घटनेची गंभीर दखल घेत, अज्ञात व्यक्तीने मुलास फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४९५/२०२५, भारतीय दंड संहिता कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
✍️ अपहृत मुलाचे वर्णन पुढीलप्रमाणे:
नाव: हर्ष योगेश शर्मा
वय: १३ वर्षे
उंची: १३५ सेमी
रंग: गोरा
बांधा: सडपातळ
केस: काळे
डोळे: मध्यम
भाषा: हिंदी, मराठी, मारवाडी
ओळख चिन्ह: डाव्या हाताच्या अंगठ्यावर तिळ
पोषाख: निळा टी-शर्ट आणि निळी पॅंट
ही घटना दि. ०८/०६/२०२५ रोजी सकाळी ६:३० वाजता घडली असून, याबाबतची नोंद १२:०७ वाजता बार्शी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
बार्शी शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना या मुलाच्या शोधासाठी पत्र देण्यात आले आहे.
📞 संपर्कासाठी:
बार्शी शहर पोलीस ठाणे: ०२१८३-२२३३३३
कोणीही नागरिक या वर्णनाच्या मुलास पाहिले असल्यास त्वरित वर नमूद केलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या