चित्रा न्युज प्रतिनिधी
जळगाव :-आरोग्य विभागाच्या समुपदेशनाने बदली प्रक्रिया पार पडली त्यात अनेक कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय बदलीतून व विनंती बदली साठी अपंगत्व सर्टिफिकेट सादर केलेले होते त्यात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी एका कर्मचाऱ्यांचे सर्टिफिकेट पडताळणी केली असता व त्या कर्मचाऱ्याला विचारले तुमचा चष्म्याचा नंबर किती आहे ते कर्मचाऱ्याला सांगता आले नाही यावरून आरोग्य विभागात अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र व बदली प्रकरणात पैसे घेऊन घेऊन अनेक व्यवहार होण्याची दाट शक्यता असल्याचे जाणवते व विनंती बदलीसाठी अनेक कर्मचाऱ्यांचे पती पत्नी आई-वडील दुर्धर आजारांनी ग्रस्त असल्याने त्यांना विनंती बदली मध्ये सूट मिळाली नाही तसा शासन निर्णय नाही असे सांगण्यात आले हे न्यायदेवतेला धरून नाही ज्या कर्मचाऱ्यांना खरोखर अडचण आहे त्यांना बदली प्रक्रियेत सूट मिळाले नाही व अपंगत्वाचे खोटे दाखले देऊन व त्यांच्या प्रशासकीय बदलीत नाव होते त्यांची नावे कमी करून प्रशासकीय बदलीतून त्यांना वगळण्यात आले याची सखोल चौकशी व्हावी
तसेच जिल्हा परिषद जळगाव येथील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचे अपंगत्व प्रमाणपत्राचे विभागीय चौकशी व्हावी व सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी धुळे बोर्ड मार्फत करण्यात यावी अशी मागणी बहुजन कर्मचारी संघटना राज्याध्यक्ष श्री भास्करराव हिवाळे यांनी केलेली आहे व सदरहू प्रकरणी कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास विभागीय चौकशी लावण्यात येईल
0 टिप्पण्या