Ticker

6/recent/ticker-posts

दक्षिण आफ्रिकेने २८ वर्षांनंतर आयसीसीचे विजेतेपद पटकावले !

चित्रा न्युज ब्युरो 
इंग्लंड : तेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने इतिहास घडवला आहे. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या २०२५ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा चार दिवसांत ५ गडी राखून पराभव केला.

दक्षिण आफ्रिकेने २८ वर्षांनंतर आयसीसीचे जेतेपद या विजयासह पटकावले आहे. एडन मारक्रमचं शतक, कगिसो रबाडाची भेदक गोलंदाजी आणि आफ्रिकेच्या प्रत्येक खेळाडूचं अमूल्य योगदान या विजयात महत्त्वाचं ठरलं.

दक्षिण आफ्रिकेने या विजयासह क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटचा पहिला वर्ल्डकप जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे हिरो होते वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि सलामीवीर एडन मारक्रम. रबाडाने सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आणि मारक्रमने चौथ्या डावात शानदार १३६ धावा केल्या. कर्णधार तेंबा बावुमानेही हॅमस्ट्रिंग दुखापतीशी झुंजताना उत्कृष्ट ६६ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेने या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची मानाची गदा पटकावली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावूमाच्या नेतृत्त्वाखाली एकही कसोटी सामना संघाने यंदा गमावलेला नाही. तेंबा बावूमाने संघाच्या मोठ्या विजयानंतर मान खाली करत शांतपणे विजयाचा आनंद साजरा केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या