चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि हमास असा संघर्ष सुरू असतानाच आता इस्राईल आणि इराणमध्येही युद्धस्थिती निर्माण झाली आहे. ‘ऑपरेशन रायझिंग लायन’अंतर्गत इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने मोठे हवाई हल्ले केले आहेत. त्यामुळे सध्या दोन्ही देशांत प्रचंड हिसाचार सुरू आहे.
इस्रायलने इराणवर हल्ला करून युद्ध सुरू केले. इस्रायलने इराणचे लष्करप्रमुख, सर्वोच्च कमांडर, अणुशास्त्रज्ञ यांना लक्ष्य केले. मात्र या हल्ल्यानंतर इराणनेही चोख प्रत्युत्तर दिलं. इराणने इस्रायलच्या राजधानीवर मिसाईलने हल्ला केला आहे.
इस्रायली हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने 13 जूनच्या रात्री 100 हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. दोन्ही देशांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जगावर पुन्हा एकदा युद्धाचे सावट उभे राहिले आहे.
0 टिप्पण्या