Ticker

6/recent/ticker-posts

हाळी येथील आरा मशीन मध्ये सागवान झाडांची आवक-जावक..!

——————————————
शासनाला लळा लागलेल्या झाडांचा तस्करं कापतात गळा...!!
 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-उदगीर तालूक्यातील हाळी येथील आरा मशीन मध्ये लाकूड तस्करं चांगली डेरेदार झाडे तोडून ती विना नंबरच्या व मुदत संपलेल्या ट्रॅक्टर मधून राञं-दिवस कटईसाठी आणत असल्याचे सामान्य जनतेला दिसते. पण सं.वन परिमंडळ अधिका-याला दिसत नसल्याने व सं.अधिका-याचे दुर्लक्ष होत असल्यानेच फळांच्या झाडांसह सागवानांची आवक अन्  जावक हाळीच्या आरा मशीन मध्ये विना नंबरच्या व मोडकळीस आलेल्या ट्रॅक्टर व ट्रक मधून होत आहे.तेंव्हा सं.अधिकारी कुठल्या वनात अडकलेत?असा सवाल हाळी हंडरगुळी परिसरातील जनतेचा आहे
 या बाबात आवाज उठवूनही याकडे ना आरटीओ खात्याने लक्ष दिले,ना वन खात्याने,ना महसूल खात्याने ! 
यामुळे हाळी-हंडरगुळी परिसरात लाकूड तस्कर मंडळी राञं-दिवस रेकी करतात.आणि मग मालकांशी सौदा करुन डेरेदार असलेल्या चिंच, आंबा,लिंब या झाडांसह सागवान या झाडांची मोठ्याप्रमाणात कत्तल करतात,व ती सगळी झाडे मुदतबाह्य झालेल्या  व नंबर नसलेल्या वाहना मधून हाळी येथील आरा मशीन मध्ये आणतात.ते पण काळ्या,हिरव्या व पिवळ्या या रंगाच्या प्लॅस्टिक मध्ये झाकुण ट्रॅक्टर मधून आणलेली लाकडे ही सागवान व चंदन असू शकतात.म्हणुनच तर झाकतात. लाकूड तस्करी करतेवेळी सापडला तर रुपये 10 हजारापर्यंत दंड आणि वाहन जप्त करण्याची तरतुद आहे. तसेच नियमभंग करणा-या  आरा मशीनवर ही दंड केले जाते.पण येथे आजवर अशी कारवाई करायचे धाडस ना आरटीओ खात्याने केले. ना वन खात्याने.यामुळे राञं-दिवस हाळीच्या आरा मशीन मध्ये तोडलेले झाडे घेऊन येणा-या विनानंबरच्या व खटारा वाहनांची रेलचेल दिसून येते.
——————————————— 

साॅ मिल वैध की अवैध ? हाळीच्या जनतेचा सवाल..

तालुक्यात एकूण वीस आरा मशीन म्हणजे साॅ मीलकडे परवाना आहे. पण हाळी येथील साॅ मील/आरा मशीन वैध आहे,का अवैध?कारण येथील आरा मशीन मध्ये तोडलेले लाकडे घेऊन दिवसा व राञी सतत खटारा व नंबर नसलेले ८ ते १० वाहने ये-जा करताना दिसतातच. तसेच येथे येणारे लाकडे नेमके कोण व कुठून आणतो?तसेच ही साॅ मील वैध का अवैध?असा सवाल हाळी परिसरातील जाणकार जनतेचा आहे 
———————————————
सावली झाली गायब..!!
पुर्वी हाळी-हंडरगुळी परिसरात मोठ मोठ्या झाडांनी शिवार बहरुन दिसत होता.तसेच उन्हाळ्यात या झाडांच्या सावलीखाली गुराढोरांसह माणसंही आराम करत होते.पण कालांतराने पैशांपायी शेतमालकं डेरेदार झाडे तस्करांना विकू लागले.म्हणुन हाळी परिसरात उन्हाळ्यात झाडांची सावली व गारवा गायब झाला.
——————————————
विना परमिट झाडांची कत्तल आणि विक्री होऊृनये,यासाठी वन विभाग लक्ष ठेवून आहे.तसेच आरा मशीन वैध की अवैध याची तपासणी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल..

रामेश्वर केसाळे.वन परिमंडळ अधिकारी,उदगीर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या