दोन दिवसात दोन मजुराला मारहाण चंदनखेडा येथील घटना
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : अवैध रेतीबाबत माहिती दिली यावरून मजुरास मारहाण
केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रेतीच्या गाडीवर कामावर का नाही आलास म्हणून दुसऱ्या मजुराला मारहाण केल्याची घटना दिनांक २३ रोज सोमवारला घडली या प्रकरणात दोन्ही मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे अशा दबंगिरी करणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्य व त्याच्या मुलासह अन्य आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जखमीच्या नातलगासह गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
अनिल गायकवाड वय ३४ राहणार चंदनखेडा व दुसऱ्या घटनेतील निलेश संतोष गोहणे २५ व त्याची आई कुसुम संतोष गोहणे वय ४० राहणार चंदनखेडा असे जखमीचे नाव आहे यातील आरोपी जिल्हा परिषद सदस्य मारोती गायकवाड त्याचे मुलगा रामेश्वर गायकवाड, गजू रणदिवे, विशाल गुंडीकवार, गणेश नन्नावरे असे आरोपींची नावे आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य मारोती गायकवाड हा गेल्या कित्येक दिवसापासून या भागात रेती तस्करी करीत आहे या गावात या दोघा बाप लेकाची दहशत असून त्यांनी रेतीबाबत प्रशासनाला माहिती देणाऱ्या मजुराला मारहाण केली तर दुसऱ्या घटनेत रेतीच्या ट्रॅक्टर वर कामावर का आला नाही दुसऱ्याच्या कामावर का गेलास म्हणून मजूर व त्याच्या आईला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. या घटनेची भद्रावती पोलिसात तक्रार करूनही त्या आरोपीला अजून पावेतो अटक करण्यात आली नसल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. अशा आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जखमीची आई कुसुम संतोष गोहणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे यावेळी चंदनखेडा सरपंच नयन जांभुळे , विकास धांडे, निकेश ढोक ,शुभम जांभुळे आधी उपस्थित होते .
*रेती तस्करी करणारा मारोती गायकवाड यांनी गावातील मजुराला मारहाण केली.यापूर्वीसुद्धा त्यांनी शासकीय अधिकारी तसेच इतर व्यक्तीवर हल्ले केले आहे या व्यक्तीमुळे गावातील शांतता भंग होत आहे. या व्यक्तीला* *चंदनखेळा गावातूनच तडीपार करण्याची मागणी प्रशासनाला करणार असल्याची माहिती नयन जांभुळे सरपंच चंदनखेडा यांनी पत्रकार परीषरदेत सांगितले* *या दोन्ही मारहाणी प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे एका प्रकरणातील* *आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या घटनेतील आरोपीवर गुन्हा* *दाखल करण्यात आला आहे यातील पुढील तपास ठाणेदार योगेश्वर पारधी भद्रावती करीत आहे.
0 टिप्पण्या