Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी

कोल्हापूर : कोल्हापूर येथील एका व्यावसायिकाच्या घरावर ईडीची धाक पडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आले. भरत लठ्ठे नाव असून ते हुपरी (हातकणंगले) येथील राहणारे आहेत. ते व्यवसायिक असून हुपरी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आहेत.

मात्र ईडीने त्यांच्या घरावर घापा का टाकला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शुक्रवारी ईडीने देशात बऱ्याच ठिकाणी छापेमारी केली. यादरम्यान लठ्ठे यांची ईडीने १४५ तास कसून यांची चौकशी सुरू होती.

यावेळी ईडीच्या पथकाने लट्ठे यांनी सुरू केलेल्या भिशी, निधी बँक आणि परवानाधारक खासगी सावकारीच्या व्यवहारांची माहिती घेतली. तसेच त्यांची बँक खातेच तपशील तसेच त्यांच्या आर्थिक व्यवहाराचे तपशील यावेळी अधिकाऱ्यांनी तपासणी केली. सलग १५ तास त्यांची कसून चौकशी सुरू होती.

लठ्ठे यांचा संबंध व्यावसायिक सत्ताधारी पक्षासोबत असल्याच सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्यापेक्षा मोठे आर्थिक व्यवहार असलेले अनेक व्यावसायिक हुपरीत आहेत. तरीही त्यांच्यावरच ईडीची छापेमारी का झाली, हे स्पष्ट झालेले नाही. या कारवाईमुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या