Ticker

6/recent/ticker-posts

संत निरंकारी मंडळ भद्रावती द्वारा योग दिवस संपन्न.




चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : दिनांक २१ जुनला "आंतरराष्ट्रीय योग दिवस" म्हणून संपूर्ण विश्वात मान्यता आहे. संत निरंकारी मिशन तर्फे शनिवार दिनांक २१ जुनला  सकाळी ०६.०० वाजतापासुन देशभरातील संत निरंकारी मिशनच्या १००० पेक्षाही अधिक शाखेत एकाच वेळेस योग दिवस अति उत्साहात संपन्न झाला.स्थानीक योग प्रशिक्षक यांच्या सहकार्याने हा योग दिवस खुले पटांगन, पार्क व भव्य हाॅलमधे घेन्यात आला.यामधे योग अभ्यासक व नागरिकांनी हिरिरीने भाग घेतला.सन २०१५ पासुन संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन सतत योग दिवस आयोजित करीत असते.२०२५ - या वर्षी संतनिरंकारी मिशनने "एक पृथ्वी - स्वस्थ संसार, सहज योग" या संकल्पने अंतर्गत योग दिवस साजरा करन्यात आला.

      संत निरंकारी मंडळ ब्रॅंच भद्रावतीने सुद्धा संत निरंकारी सत्संग भवन भद्रावती येथे " योग दिवस" निमित्त योग शिबीर आयोजित करुन मोठ्या उत्साहात संपन्न केले.योग प्रशिक्षक श्री नंदुजी खाडे व सहकाऱ्यांनी  सेवादल स्वयंसेवक व नागरिकांना योगाचे पाठ शिकविले. आजच्या प्रदुषण वातावरणात व तनावपूर्ण जिवनात सकाळच्या वेळेत योगा केल्यास शरीर स्वस्थ राहते व मन प्रफुल्लित राहते.प्रदुषणाचा व तनावपूर्ण स्थितिचा आपल्या शरीरावर काहीच विपरीत परिणाम होत नाही.असे योगाचे महत्व पटवून दिले.या शिबीराला स्वयंसेवक व अनेक नागरिकांनी ऊपस्थिती लावली.सकाळी ०६.३० ते ०७.३० पर्यंत योगा प्रशिक्षण.सकाळी ०७.३० ते ०८.३० पर्यंत सत्संग कार्यक्रम.अल्पोपहार व चहापान नंतर कार्यक्रमाची समाप्ती करन्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करन्यासाठी भद्रावती ब्रॅंच मुखी श्री के जी माटे, नितिन मारबते, विशाल नारळे, अर्चना डबरे, घोगरे परीवार व पिंपळकर परीवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या