चित्रा न्युज प्रतिनिधी
हिमाचल प्रदेश : भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर आणि जगप्रसिद्ध बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांची धर्मशाला, हिमाचल प्रदेश येथे भेट झाली. या प्रसंगी भीमराव आंबेडकर यांनी दलाई लामा यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती भेट स्वरूपी दिली.
दोघांमध्ये जवळपास १० मिनिटांचा संवाद झाला. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून सातत्याने बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार सुरू आहे. बाबासाहेबांनी दिलेला धम्ममार्ग समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या कार्याची माहिती त्यांना दिली, अशी प्रतिक्रिया भीमराव आंबेडकर यांनी दिली.
0 टिप्पण्या