Ticker

6/recent/ticker-posts

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या युक्तिवादामुळे देशातील नागरिकांना नवीन कायदेशीर आधार मिळेल !


― जितरत्न पटाईत 
परभणी :-येथील संविधान शिल्प विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विजयाबाई सूर्यवंशी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. 

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी झालेल्या सुनावणीत, न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर मॅजिस्ट्रेट चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाईबाबत कायद्यात अपूर्णता असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले.

एखाद्या व्यक्तीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला की, त्याची न्यायालयामार्फत चौकशी होते. परंतु, त्यानंतर त्या चौकशी अहवालाचे कायदेशीररित्या काय करावे? कायदेशीर तपासाची दिशा व प्रक्रिया स्पष्ट नाही, याची अस्पष्टता कायद्यात आहे. 

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ही महत्त्वपूर्ण बाब न्यायालयाच्या लक्षात आणून दिली आणि दुसरी मागणी त्यांनी केली की, या प्रकरणात न्यायालयाने स्वतंत्र SIT नेमावी जी न्यायालयाच्या अधीन असेल. (नुकतंच बदलापूर केस प्रकरणात आरोपींच्या एन्काऊंटर संदर्भात न्यायालयाने थेट SIT नेमली होती.)

ॲड. आंबेडकर यांनी कोर्टात युक्तिवाद करतांना म्हटले की, कायद्यातील तरतुद पर्ण करावी ही आमची ठाम मागणी होती, जी न्यायालयाने समजून घेतली असून याबाबत “कायदा असला पाहिजे” असे स्पष्ट मत मांडले आहे. तसेच या प्रकरणाचा जो निर्णय येईल तो निर्णय देशभरातील न्यायालयीन कोठडीत होणाऱ्या मृत्यू प्रकरणांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

हे निरीक्षण म्हणजे फक्त सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणापुरते मर्यादित नसून, भविष्यातील शेकडो प्रकरणांमध्ये दिशादर्शक ठरणार आहे. या प्रकरणातील अंतिम आदेश लवकरच अपेक्षित आहे. 

ही लढाई केवळ एका तरुणाची नव्हे, तर लोकशाहीच्या अस्तित्वासाठीची आहे. त्यामुळेच हा निर्णय म्हणजे केवळ एक न्यायालयीन आदेश न राहता, तो अनेकांना न्याय मिळवून देणारा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल, असा दृढ विश्वास बाळगायला हवा. या  न्यायालयीन लढाईतील महत्त्वाचे शिलेदार ॲड. प्रकाश आंबेडकर आहेत, यात दुमत नाही!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या