Ticker

6/recent/ticker-posts

वाढवणा पोलिसांची अवैध धंद्यावर कारवाई


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 हंडरगुळी :-विशेष पोलिस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप,पोलिस अधिक्षक अमोल तांबे,अप्पर पोलिस अधिक्षक  मंगेश चव्हाण यांच्या आदेशानुसार वाढवणा पोलिस ठाण्याचे कर्तव्य कठोर सपोनि.सुनिल गायकवाड हे सहका-यांसह ठाण्याच्या हद्दीमधील विविध गावात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर धाड सञ सुरु केले असून, या धाड सञाचाच एक भाग म्हणून वाढवणा पाटी येथे हाॅटेल दिलदार समोर एका पानटपरीत धाड टाकली असता,राज्यात बंदी असलेला रुपये २१२५ चा.गुटखा जप्त करण्यात आला असून आरोपी शरीफ लतीफ बेग (वय.३२ वर्षे.रा.वाढवणा बु.) याच्याविरुध्द डी.डी.बेंबडे (पो.हे.काॅ. अवैध धंदेविरोधी पथक क्र.२लातुर) यांनी फिर्याद दिली.म्हणुन गुरनं. १९७/२०२५ कलम,१२३,२७४, २७५,२२३ बीएनएस सह कलम ५९ अन्नसुरक्षा मानके अधिनियम २००६  या नुसार गुन्हा दाखल केला आहे.व याचा पुढील तपास पोउपनि.टोपाजी कोरके हे करत आहेत.
तसेच वाढवणा ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या आणि चाकुर तालुक्यात असलेल्या वडगाव एक्की येथील मारोती मंदीरा समोर असलेल्या गौरव किराणा दुकाणात वाढवणा पोलिसांनी धाड टाकली असता तेथे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण करणारा व शासनाने बंदी आणलेला  ४०२० रुपयाचा केसरयुक्त विमल गुटखा जप्त केला आहे.या प्रकरणी पोहेकाॅ.शिवप्रताप रंगवाळ यांनी फिर्याद दिल्याने आरोपी बाळासाहेब शंकर भुरे {वय.३८} याच्या विरुध्द गुरनं.१९८/२५ कलम १२३,२७४, २७५,२२३ बीएनएस सह कलम ५९ अन्न सुरक्षा मानके अधिनियम ०६ या प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, सपोनि.सो सुनिल गायकवाड पुढील तपास करत आहेत.
मागच्या १५ दिवसापासून सपोनि. सुनिल गायकवाड यांनी सहकारी पोलिसांसह हद्दीतल्या अवैध धंद्यांवर धाडसञ सुरु केले असून आतापर्यंत लाखो रुपयांच्या मुद्देमालासह कांही आरोपींना ताब्यात घेतले असल्याने अवैध धंदेवाल्यांमध्ये खाकीवर्दीची दहशत पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या