Ticker

6/recent/ticker-posts

सैनिक चंदू चव्हाण यांना मारहाण करणा-या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करा- बिरसा फायटर्सची मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नंदूरबार : माजी सैनिक चंदू चव्हाण यांना मारहाण करणा-या  कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,जगदीश डुडवे,दिनेश पवार, सुरेश पवार,पप्पू अवाया आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                        धुळे महानगरपालिका हद्दीत माजी सैनिक चंदू चव्हाण हे राहत असलेल्या परिसरात खाणीचे साम्राज्य पसरले आहे.परिसरामध्ये स्वच्छता ठेवण्यात यावी,या मागणीसाठी आयुक्त महानगर पालिका कार्यालय समोर आंदोलन सुरू असतांना माजी सैनिक चंदू चव्हाण यांना अतिक्रमण विभागाचे अधिकारी प्रसाद जाधव व कर्मचारी युवराज खरात यांनी लाथ मारून धक्काबुक्की केल्याचा विडीओ सोशल मिडीयावर वायरल होत आहे.एका सैनिकाला अशा पद्धतीने वागणूक देऊन मारहाण केल्याचा या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.
           चंदू चव्हाण हे सैन्यात भारत पाकिस्तान सीमेवर कार्यरत असताना त्यांनी सीमा क्राॅस करून पाकिस्तानात प्रवेश केला. या कारणास्तव त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.भारत सरकारने त्यांना नोकरीतून काढून आधीच त्यांच्यावर अन्याय केलेला आहे.त्यासाठी त्यांचा संघर्ष देशातील सर्व नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे. धुळे महानगरपालिका हद्दीत ते राहत असलेल्या परिसरात खाणीचे साम्राज्य पसरले आहे,म्हणून त्यांनी मा जिल्हाधिकारी धुळे व मा.आयुक्त, महानगरपालिका धुळे कार्यालयाच्या अनेकदा चकरा मारल्या.परंतू परिसरातील घाण साफ करण्यात आली नाही.म्हणून त्यांनी नाईलाजाने महानगरपालिका धुळे समोर आंदोलन सुरू केले.परंतू त्यांचा आवाज व मागणी दाबण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी एका सैनिकाला लाथ मारून धक्का देऊन बाहेर काढले.ही एक निंदनीय कृती आहे.एका सैनिकाला अशा पद्धतीने वागणूक दिली जात असेल तर हे आम्ही कदापी सहन करणार नाहीत. माजी सैनिक चंदू चव्हाण यांच्या आंदोलनाचे आम्ही जाहीर समर्थन करतो. माजी सैनिक चंदू चव्हाण यांना लाथांनी मारहाण करून धक्काबुक्की करणा-या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा व सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या