पत्रकार संजीव भांबोरे यांनी माजी पंचायत समिती सदस्य अरुण गोंडाणे यांची घेतली मुलाखत
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:- दिनांक 25 जुलै 2025 ला माजी पंचायत समिती सदस्य अरुण गोंडाणे यांची पत्रकार संजीव भांबोरे यांनी प्रत्यक्ष मुलाखत घेऊन पहेला येथील मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांना उत्तर देताना सांगितले की ,पहेला जिल्हा परिषद क्षेत्रातील पहेला ग्रामपंचायत सर्वात मोठीअसून उत्पन्नाचे साधन सुद्धा या ग्रामपंचायतला आहे त्याचप्रमाणे आठवडी बाजाराचे ठिकाण सुद्धा आहे .परंतु 1997 पासून या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण ,पक्का रस्ता अजून करण्यात आलेला नाही. या रस्त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली असून ग्रामपंचायत ने याकडे तात्काळ लक्ष देऊन सदर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केलेली. आहे.तालुक्यातील पहेला येथील मशान भूमीकडे जाणाऱ्या अर्धा किलो मीटरची अत्यंत दैनिक व्यवस्था असून ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्यावर चिखल सुद्धा साचलेला आहे. पायदळ चालताना सुद्धा मोठी दमचाक करावी लागते. आज दिनांक 25 जुलै 2025 ला गावातील एका गृहस्थाची मयत झाली असता मशानभूमीकडे जाणाऱ्या सर्वच स्त्री पुरुषांची मोठी फजिती झाली. कोणी चप्पल घसरून खाली पडले. पहेला गावाची लोकसंख्या जवळपास 3000 हजार असून जवळपासच्या गावामध्ये मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात सौंदर्यकरण करून रस्त्याची सुधारणा करण्यात आली आहे .मात्र 3000 लोक वस्तीच्या गावात मात्र मशान भूमीमध्ये सौंदर्यकरण नाही. अर्ध्या किलोमीटरच्या रस्त्याची दुरावस्था आहे. सदर रस्त्याकडे ग्रामपंचायत ने तात्काळ लक्ष देऊन त्या रस्त्याची सुधारणा करावी व मशानभूमीमध्ये सौंदर्यकरण करावे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. त्याचप्रमाणे सदर रस्त्याबाबत माजी पंचायत समिती सदस्य अरुण गोंडाने यांनी नाराजी व्यक्त केली.
0 टिप्पण्या