Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी संघटनांचे तळोदा येथे रास्ता रोको आंदोलन;आदिवासींची जमीन परत करा व अतिक्रमित शिंदेगट कार्यालय हटविण्याची जोरदार मागणी

आमदार चंद्रकांत रघुवंशीविरोधात जोरदार घोषणाबाजी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
तळोदा :- बिरसा फायटर्स, भारत आदिवासी संविधान सेना व भारतीय स्वाभीमानी संघ या आदिवासी संघटनांकडून २५ जुलै २०२५ रोजी अमरधाम पूल तळोदा शहादा मुख्य रस्त्यावर जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अमोल कोल्ड्रिंक समोरील तळोदा- शहादा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधण्यात आलेले शिवसेना शिंदेगटाचे कार्यालय तात्काळ हटवा व  मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून कार्यालय बांधणा-यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कडक कारवाई करा, तळोदा येथील अतिक्रमित कार्यालयाला संरक्षण देणा-या श्री.विक्रम जगदाळे मुख्याधिकारी नगरपरिषद तळोदा यांना तात्काळ पदावरून हटवा व शिवसेना शिंदेगटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासींच्या बेकायदेशीर हडप केलेल्या जमिनी परत करा,अशी जोरदार मागणी करण्यात आली.
                      तळोदा शहादा  मुख्य रस्ता अर्धा तास चक्का जाम करण्यात आले.त्यामुळे काही वेळ  वाहतूक बंद करण्यात आली. आंदोलकांनी रस्त्यावर आपले आंदोलन सुरूच ठेवले.पोलिसांच्या मध्यस्थीने नगरपरिषद प्रशासनाकडून वरिष्ठ स्तरावरुन आदेश मिळताच तात्काळ अतिक्रमण कार्यालय हटविण्यात येईल,असे लेखी पत्र मिळाल्यानंतर दुपारी १ वाजता आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. १० दिवसांत नगरपरिषद ने अतिक्रमित शिंदेगट कार्यालय हटविले नाहीतर आम्ही पुढील मोर्चा शिंदेगट कार्यालय कडे वळवून आदिवासी स्टाईल ने कार्यालय उचलून फेकून देवू,असा इशारा देण्यात आला. नगरपरिषद प्रशासनाकडून पत्र द्यायला उशीर झाला म्हणून कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली.
                    यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,बिरसा फायटर्सचे प्रदेशाध्यक्ष गोपाल भंडारी,भारतीय स्वाभीमानी संघाचे जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,नंदूरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी,बिरसा फायटर्सचे विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,उपाध्यक्ष किसन वसावे,बिलीचापडा अध्यक्ष वनसिंग पटले,हाना पटले, सुरेश पवार, दिलीप मुसळदे, कैलास मुसळदे,कैलास पवार,जितेंद्र भंडारी ,भारत आदिवासी संविधान सेनेचे ईकबाल शेख, सुनिल भील,आनंद सोनवणे,चंदू भील, राजेश ठाकरे, रोहित पवार, सौरभ ठाकरे आदि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
                       जमीन आमच्या हक्काची,नाही कुणाच्या बापाची,वापस करो ,वापस करो,आदिवासियोंको जमीन वापस करो,या भूमाफियांचे करायचे काय,या जमीन लूटारूंचे करायचे काय,अतिक्रमित शिंदेगट कार्यालय हटलेच पाहिजे,चंदू तेरी दादागिरी, नही चलेगी,गबरू तेरी दादागिरी, नही चलेगी,भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी मूर्दाबाद,अशा आमदार चंद्रकांत रघुवंशीविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या