Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. विजय चऱ्हाटे साहेब यांना राज्यस्तरीय भिमरत्न पुरस्कार देऊन सन्मानीत मेहकर शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील देवमाणुस एक उभरता अनमोल हिरा - तथागत ग्रुप महा. राज्य संघटना संस्थापक अध्यक्ष संदिप गवई


चित्रा न्युज प्रतिनिधी 
बुलढाणा- मेहकर येथील वैद्यकिय क्षेत्रातील देवमाणुस मेहकरचे सुप्रसिध्द डॉ.विजय चऱ्हाटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने सर्व मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय भिमरत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या व सर्व मित्रपरिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे  मातोश्री हाँस्पिटल मेहकर येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई हे होते. यावेळी आपल्या अध्यक्ष भाषणातून तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई म्हणाले डॉक्टर पेशा हा लोकांना जीवदान देणारा असून या पेशामध्ये प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा असतो. रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा असे मानून आपले सर्वस्व समाज हितासाठी जोपासणारे डॉ.विजय चर-हाटे साहेब वैद्यकीय क्षेत्रातील अनमोल हिरा आहे. त्यांचे आपण जतन केले पाहिजे असे प्रतिपादन याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यत करत साहेबांना वाढदिवस निमित्ताने शुभेच्छा दिल्या..

यावेळी, संदिप गवई, गजानन सरकटे, रविंद्र वाघ, अख्तर करेशी, संदिप राऊत, प्रकाश सुखधाने, कुणाल माने, देवानंद वानखेडे, इलीयास कुरेशी, नबी कुरेशी, यावेळी समस्त मान्यवर व मित्रपरिवार उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या