चोरीच्या गाड्यांची व्यक्त होते भीती !
हंडरगुळी :-ना पुढे,ना मागे अशाप्रकारे कुठेही नंबर नसलेल्या तसेच मुदतबाह्य झालेल्या शेकडो गाड्या गत कित्येक दिवसापासून हाळी हंडरगुळी येथे बिनधास्तपणे धावत असल्याचे बघून यातील कांही गाड्या चोरीच्या असू शकतात.अशी भीती जाणकार हाळी - हंडरगुळीकरातून वर्तवली जाते.
नवीन गाडी पासिंगशिवाय खरेदीदार व्यक्तीच्या हाती द्यायचे नाही.असा कायदा आहे.तसेच नंबर प्लेट सुध्दा लवकरच मिळतो.आणि तो बसविणे अत्यंत गरजेचे आहे.आणि तसा दंडक असतानाही येथे नंबर नसलेली शेकडो वाहने बेदरकारपणे धावताना दिसतात.कारण,अशा वाहनांवर दंड तथा कारवाई करणारी यंञणाच येथे नसल्याने याची तक्रार करायची कुठे म्हणुन विनानंबरच्या वाहनचालक मंडळींची चलती दिसून येते.तसेच यातील कांही वाहने चोरीची पण असू शकतात.
कारण,नोकरदार,शेतकरी व व्यापारी असलेल्यांकडे नाहीत,अशा नवीन माॅडेलच्या व महागड्या बाईक 'पसाभर'ही शेती नाही.तसेच कोणती नोकरी व चांगला व्यवसाय यापैकी कांहीही नाही. तरीही अनेक व्यक्तीं जवळ महागड्या गाड्या येतात कशा व कोठून?याचा शोध घेणारी यंञणा येथे नसल्याने याचा शोध घेणार कोण? याचा शोध घेऊन कारवाई केल्यास नक्कीच चोरीच्या गाड्या सापडण्याची दाट शक्यता आहे.
नवीन गाड्यांना नंबर प्लेट्स बसविल्याशिवाय ते वाहनधारकांना देऊ नये,असा कायदा आहे.तसेच अशी वाहने दिल्यावर खरेदीदार व विक्रेत्यांवर कारवाई होते.असा दंडक व नियम आहे.तरीही येथे कारवाई करणारी यंञणाच अद्याप उदयाला आली नाही.म्हणूनच हाळी हंडरगुळीत नंबर नसलेल्या नवीन तसेच मुदत संपलेल्या जुन्या खटारा गाड्या शेकडोंच्या संख्येत बिनधास्त पणे व बेदरकारपणे येथे धावताना दिसतात.तसेच याबाबत ओरड करुनही अशा वाहनांवर कारवाईचे धाडस कुणीही दाखविले नाही. म्हणुन खटारा झालेल्या तसेच नंबर नसलेल्या वाहनांच्या चालकांची मस्ती व चलती बघता नंबर नसलेले व मुदत संपलेले वाहनांचे ड्रायव्हर व मालक मंडळी कारवाई करण्याचे आव्हान संबंधित यंञणेला देतात. तेंव्हा त्या वाहनधारकांचे आव्हान संबंधित यंञणा स्विकारते का मुके, बहीरे व आंधळे असल्याचे नाटक करते?याकडे जनतेचे लक्ष आहे.
0 टिप्पण्या