Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील ओबीसी मुलींचे वसतिगृह असुरक्षित..

नागपूर येथील ओबीसी मुलींच्या वस्तीगृहात सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण ऐरणीवर...तर भंडाऱ्यातील महिला ओबीसी वस्तीगृहाला ओबीसी क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाची भेट...नागपूर येथील मुलींच्या ओबीसी वस्तीगृहात झालेल्या घटनेतील आरोपीवर तात्काळ कारवाई करा...ओबीसी क्रांती मोर्चाची मागणी...

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा ;- महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील मुलींच्या वस्तीगृहात बाहेरील दोन व्यक्ती शिरून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.राज्यातील महायुतीचे सरकार राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री  यांच्या गृह जिल्ह्यात ही घटना घडलेली आहे.आमच्या डीएनए ओबीसीचा आहे ओबीसी साठी आम्ही काहीही करू शकतो अशी म्हणणारी सरकार,स्मार्ट सिटीच्या मोठ्या बाता करणारी सरकार ओबीसींच्या मुलींच्या वस्तीगृहात सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावू शकत नाही.गेटला लॉक लावू शकत नाही तर गेटवर चौकीदार ठेवू शकत नाही.अश्या नागपूर सारख्या शहरात जर अशी सुरक्षेची व्यवस्था असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात वस्तीगृहांची काय स्थिती असेल तर हे विचार न केलेले बरे..याच पार्श्वभूमीवर ओबीसी क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने भेट देत पाहणी केली असून काही त्रुटी व समस्या आढळून आले आहे.या सरकारने तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी सुद्धा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या गाजावाजा करत लाखो रुपये उधळून इलेक्शन समोर ठेवून वस्तीगृहाचे उद्घाटन केले.परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या संबंधी काळजी घ्यायला मुख्यमंत्री साहेब विसरलेत काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.नागपूर येथील ओबीसी मुलींनीच्या वस्तीगृहात झालेली घटनेतील दोषींवर तात्काळ कारवाई करून महाराष्ट्रातील सर्व ओबीसी,एससी,एसटी मुलींनां न्याय द्यावा अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे.अन्यथा ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी केले आहे.यावेळी शोभा बावनकर महिला अध्यक्ष,मनीषा भांडारकर तालुकाध्यक्ष, नम्रता बागडे,सीमा काळे,वैशाली रामटेके,शोभना सरोजकार,सारिका नागदेवे,श्वेता बावनकर,जीवन भजनकर,यशवंत सूर्यवंशी ,वाहित बाबर,आशिष चन्ने,सुरेंद्र सार्वे,योगेश ठवरे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या