चित्रा न्युज प्रतिनिधी
तळेगाव दशासर :- स्थानिक येथील परिसरात गेल्या अनेक दिवसापासून अवैध धंद्यांना अक्षरशः उत आला आहे. पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर सऱ्हास अवैध देशी तसेच विदेशी दारूची विक्री सुरु आहे. तसेच परिसरातही अवैधरित्या देशी तथा विदेशी दारूची राजरोस पणे विक्रि सुरु असून येथील पोलीस प्रशासनाचे याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष होतांनी दिसत आहे. याआधी तत्कालीन ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांच्या कारकिर्दीत काही प्रमाणात अवैध धंद्यांना आळा बसलेला होता. परंतु त्यांची बदली होताच अवैध धंदे करणाऱ्या व्यवसायिकांनी आपले डोके वर काढलेले आहे. व बिन्दास्त पणे दारूची विक्री करीत आहे. त्यामुळे गावातील वातावरण अशांत होण्याच्या मार्गांवर आहे. नव्यानेच तळेगाव ठाण्यात रुजू झालेले ठाणेदार किरण औटे याकडे लक्ष देऊन अवैध धंदे बंद करतील का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महत्वाचे असे की गावातील महत्वाचे ठिकाण असलेले ज्यस्तंभ चौक येथील परिसरातच खुलेआम अवैध दारू विक्रि केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय व मस्जिद सारखे धार्मिक स्थळ असून सुद्धा अशा ठिकाणी अवैध दारुविक्री होत असून संबंधित प्रशासानाचे दुर्लक्ष होत असल्याचे गावकऱ्यांकडून बोलल्या जात आहे.
0 टिप्पण्या