चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-शासन आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणजे तलाठी.ग्रामीण बोली भाषेत पुर्वी यांना लाडाने बाजीराव असे म्हणत.आणि आता हेच तलाठी सज्जा नसल्याने उदगीर शहरातून कारभार बघत आहेत.आणि येथील तलाठ्याला शोधण्याकामी शेतकरी बांधवांना दररोज उदगीर शहरात हेलपाट्या माराव्या लागत आहेत.
हंडरगुळीत एका खुपजुन्या दुकाणा मध्ये बाजीरावाचे हक्काचे कार्यालय होते.अन् या जुनाट व मोडकळीस आलेल्या कार्यालयातूनच कारभार हाकला जायचा.पण कालांतराने या कार्यालयाची मोठी दुरवस्था झाली. तसेच पावसाच्या पाण्यामुळे सर्वञ ओल होऊ लागल्याने हे कार्यालय डेंजर झोन मध्ये गेले.परिणामी धोका नको म्हणुन कांहीकाळ जागा असेल तेथे दप्तर मांडून शेतक-यांचे प्रश्न बाजीराव सोडवू लागले.तसेच कांही दिवस हाळीच्या तलाठी आॅफीस मधूनही कार्य केले.परंतू,नंतर सरळ आपले उदगीर भले म्हणुन शहरातून कामकाज बघू लागले.अशा प्रकारे शेतक-यांऐवजी तलाठ्याची धावा- धाव होत असल्याचे बघून कर्तबगार ग्रा.पं.प्रशासनाने येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या अंगणवाडी शेजारी तलाठी कार्यालयासाठी हवी तेवढी जागा दिली.आणि तात्काळ तेथे जोमात बांधकाम सुरु झाले.व हे बघून आता कायमस्वरुपी कार्यालय होणार,ते पण सर्वसोयीनियुक्त होतेय म्हणुन तलाठ्यासह शेतकरुबांधवात आनंद,समाधान व्यक्त होत असताना जोमात सुरु असलेले हे बांधकाम अचानक कोमात गेले.म्हणजे बंद पडले ते ४ महिने झाले तरीही सुरु व्हायचे नाव घेईना.यामुळे शेतकरी बांधवांना छोट्यामोठ्या कामांसाठी उदगीरला हेलपाटे मारावे लागतआहे तसेच हंडरगुळी,सुकणी,आनंदवाडी येथील शेतकरीबांधवांना ७/१२ व ८ अ,चा उतारा काढण्यासाठी तसेच विहीरीसह गोठ्याची व फळबाग, आणि पिकांची नोंद ७/१२ उता-या- वर घेण्यासाठी येथे तलाठी येण्याची तसेच आले तर कुठे बसलेत?हे शोधत हिंडावे लागत आहे.गावात आले नाहीत.असे कळताच उदगीर मध्ये शोधत हिंडावे लागत आहे. तेंव्हा संबंधित खात्याने शेतक-यांची होणारी पळापळ व गैरसोय लक्षात घ्यावे आणि बंद पडलेले हंडरगुळीचे तलाठी कार्यालयाचे बांधकाम पुन्हा जोमात सुरू करावे.
सुरुवातीला मोठ्या जोमात चालणारे तलाठी कार्यालयाचे बांधकाम कोमा मध्ये का गेले?म्हणजे बंद का झाले?असा प्रश्न केला असता केवळ बजेट अभावी बांधकामाला ब्रेक लागला आहे.अशी माहिती तलाठी तानाजी शिंदे यांनी दिली आहे.
तसेच जेवढे बजेट होते तेवढेच बांधकाम झाले आहे.अशी माहिती सरपंच विजय अंबेकर यांनी दिली.
0 टिप्पण्या