Ticker

6/recent/ticker-posts

हिमायतनगर पळसपुर डांबरीकरण रस्त्याचे काम बोगस. उत्कृष्ट कामाचा निकृष्ट नमुना महिन्याभरातच रस्ता उखडला कार्यकारी अभियंता गप्प का तर कनिष्ठ अभियंता नोटरीचीबल नागरिकांतून संताप


हिमायतनगर जवळील नडवा पूल आणि रस्त्याचे काम जैसे थे 

लिंगोजी कदम  जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड

हिमायतनगर.    शहरातुन  मराठवाडा पळसपुर डोलारी तर विदर्भ ढाणकी गावाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम नुकतेच एक महिन्यात करण्यात आला असून, अवघ्या महिन्यांत रस्त्याचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे महिन्याभरातच रस्ता खचून उखडला संबंधित ठेकेदाराने केलेल्या बोगस रस्ता कामाबद्दल नागरिक, शेतकरी, वाहनधारकातून तीव्र संतापाची लाट उमटतांन दिसत आहे  हिमायतनगर शहरातुन ढाणकी मार्गे विदर्भाकडे जाणाऱ्या हिमायतनगर ते सिरपल्ली पर्यंत रस्त्यासाठी मागील चार वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. रस्त्याचे काम औरंगाबाद येथील एम ए सिद्दीकी नामक ठेकेदारास  देण्यात आले होते संबंधित ठेकेदाराने
अभियंत्याशी हातमिळवणी करून हिमायतनगर पळसपूर डोल्हारी पर्यंत रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने केले आहे. रस्त्याचे काम करताना अनेक नागरिक, शेतकऱ्यांनी रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. मात्र नागरिकांच्या तक्राराईला ना जुमानता ठेकेदारने मनमानी पद्धतीने थातुर माथूर रस्ता करून हिमायतनगर शहरानजीक रस्त्याचे काम अर्धवट ठेऊन शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. नुकताच झालेल्या
डांबरी रस्ता कामास महिना उलटला नसताना हिमायतनगर पळसपूर डांबरीकरण रस्त्याची वाट लागली असल्याचे चित्र रस्त्यावर दिसून येत आहे. डांबरीकरण रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, ट्रॅक्टर सारख्या वाहनाने
ठीक ठिकाणी रस्ता खचला आहे. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी पाहणी केली असता केवळ इंचभर डांबरीकरण केल्याचे दिसून येते आहे. गुत्तेदाराच्या केलेल्या या मनमानी कामाकडे संबंधित अभियंत्याने देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शेतकरी, नागरिक, वाहनधारक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
हिमायतनगर ते पळसपूर या बोगस डांबरीकरण रस्ता कामाची प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी करावी, आणि दोषी गुत्तेदाराच्या एजन्सीचे नावं काळ्या यादीत टाकून हिमायतनगर शहरानजीक राहिलेल्या अर्धवट रस्त्यासह येथील नडव्याच्या पुलाचे काम चांगल्या गुत्तेदारा मार्फत काम पूर्ण कुरुन द्यावे अशी मागणी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष नागोराव शिंदे पळसपुरकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली   आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या