Ticker

6/recent/ticker-posts

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तीन युवतींना जातीवाचक शिवीगाळ — सामाजिक कार्यकर्त्यांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी....

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

पुणे: सत्तेच्या मस्तीमुळे निर्ढावलेले राज्यकर्ते आणि त्यांच्या दबावाखाली काम करणाऱ्या सरकारी यंत्रणांनी सामान्य जनतेचे आयुष्य अजून कठीण केले आहे. या व्यवस्थेचा फटका विशेषतः दीन-दुबळ्या आणि मागासवर्गीय समाजातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. असाच एक गंभीर प्रकार नुकताच पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये घडला, जिथे तीन युवतींना जातीवाचक शिवीगाळ झाल्याचा आरोप आहे.
            या प्रकरणावर कडक कारवाई व्हावी, दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जावी, या मागणीसाठी *सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब गायकवाड, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, विकीभाऊ सदाफुले, पै. हवादादा सरनोबत, प्रा. विकीसर घायतडक, सनी सदाफुले, अशोक आव्हाड, सचिनआण्णा सदाफुले, शिवाजी ससाणे, जोंगेद्र थोरात, मुंकूद घायतडक, आकाश साठे, विशाल समिंदर, सौ. सुरेखाताई सदाफुले, विक्रांत आब्दुले, अवधुत पवार, सूर्यकांत सदाफुले, आकाश घायतडक, अनिल जावळे* यांनी एकत्र येत जामखेड तहसिल कार्यालय पोलीस ठाण्यात निवेदन दिले.

सदर घटनेचा गांभीर्याने घेतला जाईल, असा विश्वास प्रशासनाने दिला आहे. मात्र, या प्रकरणात तत्काळ आणि कठोर कारवाई झाली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या