प्रबोधनकार संघटनेचे भावेश कोटांगले व चमूचे भंडारा जिल्ह्यात अभिनंदन
चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर -महाराष्ट्र शासन कामगार विभाग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्र.१ नागपूर च्या वतीने आयोजित गटस्तरीय सांघिक समरगीत/स्फूर्ती गीत स्पर्धा आज दि. ९ आॅगष्ट २०२५ रोजी ललित कला भवन इंदोरा नागपूर येथे आयोजित केलेली होती. या स्पर्धेत प्रतिभावंत संघटनेचे भावेश कोटांगले व त्यांच्या चमुने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून भंडारा जिल्ह्याचे नाव नावलौकिक केले. ही भंडारा जिल्ह्याकरिता अभिमानास्पद बाब असल्याचे मत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी व्यक्त केले.
त्यामध्ये कामगार कल्याण केंद्र साकोली संघाच्या वतीने सतीश कुटे कामगार कल्याण केंद्र प्रमुख साकोली यांच्या नेतृत्वात प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोलीचे पदाधिकारी ,कलावंत यांचे समरगीत सादर करण्यात आले.त्यामध्ये भावेश कोटांगले, लक्ष्मीकांत बोरकर, संदिप कोटांगले, पितांबर सूर्यवंशी,वृषभ राणे, हासराम तुमसरे, अर्चना कान्हेकर, करिष्मा भाग्यवंत, संगीता पुस्तोडे, प्रज्ञाशील मेश्राम, खुशाल इठोले, अभिषेक रामटेके, प्रल्हाद भुजाडे यांनी सहभाग नोंदविला होता.
0 टिप्पण्या